पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत सुर्यदत्ता ज्युनिअर कॉलेजने घवघवीत यश संपादन केले. यंदा कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के, कला शाखेचा 96 टक्के, वाणिज्य शाखेचा 93 टक्के, तर एमसीव्हीसीचा निकाल 100 टक्के लागला आहे, असे प्राचार्या वंदना पांडे यांनी सांगितले.
विज्ञान शाखेत मृगजा ओगले (93.2) हिने प्रथम, सिद्धार्थ साठे (92 टक्के) याने द्वितीय, तर साहिल कलिंग (90.8 टक्के) याने तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेत अंजली झुंजा व किशिका चौहान (88.15 टक्के) यांनी संयुक्तपणे प्रथम, साक्षी डांगी (87.2 टक्के) हिने द्वितीय, तर ध्रुव नायक (85.6 टक्के) याने तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेत नेहा शिंगणे 90 टक्के गुण मिळवून प्रथम आली. जुई शिंत्री व श्रेया कुलकर्णी यांनी 89.5 टक्के गुण मिळवून संयुक्तपणे द्वितीय, तर जान्हवी कापघाटे हिने 89.3 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. ‘एमसिव्हीसी’मध्ये देव जोशी (87.1 टक्के) याने प्रथम, पार्थ पटेल (85.7 टक्के) याने द्वितीय, तर सिद्धांत कुलकर्णी (79.5 टक्के) याने तृतीय क्रमांक पटकावला, असेही वंदना पांडे यांनी नमूद केले.
सुर्यदत्ता ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक या सर्वांचे अभिनंदन केले. डॉ. चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या विविध उपक्रमाचा फायदा झाला. विविध संसथांबरोबर सामंजस्य करार, डिजिटल लर्निंग, लाईव्ह सेमीनार्स आणि इतर उपक्रम विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरले. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिगत मार्गदर्शन, सल्ला व समुपदेशन केल्याचा हा परिपाक आहे.”