5 सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप देणारा भारत पहिला देश बनला
भारताने पाच टी-20 मालिकेतील अखेरच्या सामन्यात न्यूजीलंडचा 7 धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने मालिका 5-0 ने आपल्या खिशात घातली. भारत पाच सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप देणारा पहिला देश बनला. यासोबतच टीम इंडिया सलग 8 सामने जिंकण्यात यशस्वी ठरली. तर न्यूजीलंडचा संघ सलग सहाव्या सामन्यात पराभूत झाला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गडी बाद 163 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरासाठी मैदानात उतरलेल्या न्यूजीलंड संघाला 20 षटकांत 9 गडी बाद 156 धावांपर्यंत मजल मारता आली. दोन्ही देशांमध्ये 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 5 फेब्रुवारी रोजी हॅमिल्टन येथे होणार आहे.
टी-20 च्या इतिहासात ही तिसरी 5 सामन्यांची मालिका होती. यापूर्वी 5 सामन्यांच्या दोन मालिका झाल्या. ज्यात इंग्लंडने न्यूजीलंडला आणि वनुअतु संघाने मलेशियाला पराभूत केले होते. एकदा 7 टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. ज्यात मलावीने मोझम्बिकचा पराभव केला होता.
भारताने मालिकेतील दोन सामने सुपर ओव्हरमध्ये जिंकले
मालिकेतील पहिला सामना ऑकलंड येथे झाला. येथे भारताने न्यूजीलंडचा 6 गड्यांनी पराभूत केले होते. दुसरा सामना सुद्धा याच मैदानावर झाला, हा सामना भारताने 15 चेंडू आणि 7 गड्यांनी जिंकला होता. तिसरा आणि चौथा सामना टाय झाला होता. या दोन सामन्यांच्या सुपर ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवला होता. हॅमिल्टन टी-20 मध्ये रोहित शर्माने सलग दोन षटकार लगावत भारताला विजय मिळवून दिला होता. तर चौथ्या वेलिंग्टन सामन्यात राहुल आणि कोहलीने भारताला जिंकवले होते.
टेलर-शिफर्टने शिवम दुबेच्या षटकात 34 धावा केल्या
टेलर-शिफर्ट यांनी शिवम दुबेच्या एका ओव्हरमध्ये 34 धावा काढल्या. दुबे टी-20मध्ये भारताकडून एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज बनला आहे. दुबेने याबाबत स्टुअर्ट बिन्नीला मागे टाकले आहे. बिन्नीने 2016 मध्ये वेस्टइंडीजविरुद्ध लाउडहिल, अमेरिका येथील सामन्यात 32 धावा दिल्या होत्या.
बुमराहने गप्टीलला बाद करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली
तत्पूर्वी जसप्रीत बुमराहने सलामीवीर मार्टिक गप्टिलला 2 धावांवर पायचीत केले. यानंतर कॉलिन मुनरो 15 धावांवर बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरने मुनरोचा त्रिफळा उडवला. तर राहुलने टॉम ब्रूसला रनआउट केले.
रोहित आणि राहुलची 88 धावांची भागीदारी
सुरुवातील भारताकडून फलंदाजीसाठी मैदानात उतरेलल्या रोहित शर्माने 60 आणि लोकेश राहुलने 45 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 33 आणि मनीष पांडे नाबाद 11 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून स्कॉट कुगलिनने 2 गडी बाद केले. रोहित 41 चेंडू खेळल्यानंतर दुखापग्रस्तमुळे रिटायर्ड हर्ट झाला. रोहित आणि राहुलने दुसऱ्या गड्यासाठी 88 धावांची भागीदारी केली. तर शिवम दुबे फक्त 5 धावा करून कुगलिनच्या चेंडूवर बाद झाला.
संजू सॅमसन पुन्हा ठरला फ्लॉप
संजू सॅमसन फक्त 2 धावांवर कुगलिनच्या चेंडूवर सेंटनरच्या हाता झेल दिला. सॅमसन पुनरागमन झाल्यानंतर सलग तिसऱ्या सामन्या अयशस्वी ठरला. त्याने चौथ्या टी-20 सामन्यात केवळ 8 धावा काढल्या होत्या. तत्पूर्वी जानेवारीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात फक्त 8 धावांची खेळी केली होती.