भारतीय नौकानयन संघटना (Yachting Association Of India-YAI) वरीष्ठ राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धा 2022 (आशियाई खेळ निवड चाचणी) मधल्या शर्यती, मुंबई बंदरालगत समुद्रात आयोजित केल्या जातील.
भारतीय नौकानयन संघटना आणि भारतीय नौदल नौकानयन संघटना (INSA) यांच्या अंतर्गत, भारतीय नौदल नाविक कौशल्य प्रशिक्षण केंद्र (INWTC)-मुंबई ने, ही स्पर्धा आयोजित केली आहे. वरिष्ठ वर्गांसाठी आयोजित ही स्पर्धा 13 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धकांचे गुणांकन करुन त्यांचे मानांकन निश्चित करण्यासाठी, YAI ही स्पर्धा आयोजित करते आणि ही स्पर्धा, चीनमध्ये सप्टेंबर 2023 मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड चाचणीही असणार आहे.
देशभरातील 15 नौविहार क्लबमधील 115 हून अधिक नाविक-स्पर्धकांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. आठ प्रकारच्या बोटींच्या आठ श्रेणींमध्ये, प्रत्येक श्रेणीत 12 शर्यती, अशी शर्यतींची मालिका होईल. ILCA 7, ILCA 6, 49er, 49erFX, 470, NACRA 17, RS:X आणि IQ फॉइल, या आठ प्रकारच्या नौकांचा, या आठ श्रेणींमध्ये समावेश आहे. पुरुष, महिला आणि मिश्र अशा गटांमध्ये या स्पर्धा होतील.
स्पर्धा आयोजनाची जबाबदारी घेतलेल्या अधिका-यांचे एक पथक, स्पर्धा योग्य वातावरणात नि:पक्षपणे पार पडतेय की नाही आणि सर्व स्पर्धकांना शर्यतीसाठी एकसमान साधनसामुग्री तसच या स्पर्धेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा एक सारख्याच मिळतात की नाही यावर लक्ष ठेवतील, तशी खातरजमा करतील. ओमान, कोरिया आणि सिंगापूर या देशांमधील परदेशी शर्यत अधिकाऱ्यांसह, जागतिक नौकानयनाची पात्रता मिळवलेले आंतरराष्ट्रीय शर्यत अधिकारी, आंतरराष्ट्रीय परिक्षक आणि स्पर्धकांच्या शर्यतीतील कामगिरीची नोंद ठेवणारे मोजणीदार यांचा या पथकात समावेश असेल.
P2QF.jpeg)
RM3H.jpeg)