मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बहिण विजया पाटील यांच्यानंतर अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर देखील प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे.
सकाळी ६ वाजेपासून ही कारवाई करण्यात येत आहे. तब्बल १२ तास प्राप्तिकर विभागाने ही चौकशी केली आहे. सकाळपासून अतित पवार यांच्या बहिणी आणि संबधिक कंपन्यांवर छापेमारी झाली होती. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर ही छापेमारी करण्यात आली. सात ते आठ अधिकाऱ्यांनी ही चौकशी केली आहे.