नवी दिल्ली, २५ ऑगस्ट २०२२: – सुरुवातीपासूनच होंडाने असामान्य दर्जा आणि कामगिरीच्या जोरावर १२५ सीसी एक्झक्युटिव्ह क्षेत्रावर वर्चस्व गाजवले आहे. ग्राहकांना आणखी एका रूपात आनंद देण्यासाठी होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने आज नवी शाइन सेलिब्रेशन एडिशन लाँच केली आहे.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘संपूर्ण देश सणासुदीच्या दिवसांसाठी सज्ज होत असतानाच एचएमएसआयनेही ग्राहकांचा आनंद द्विगुणित करण्याचे ठरवले आहे. ‘सर्वात आकर्षक एक्झक्युटिव्ह मोटरसायकल’ म्हणून प्रसिद्ध असलेला ब्रँड शाइन लाखो भारतीयांना आजही आनंद देत आहे. मला विश्वास वाटतो, की या गाडीची नवी सेलिब्रेशन एडिशन उत्सवाची मजा आणखी वाढवेल आणि ग्राहकांना आनंद देईल.’
भारताची सर्वात आवडती १२५ सीसी मोटरसायकल नव्या रूपात
नवी शाइन सेलिब्रेशन एडिशन आपल्या गोल्डन थीमसह नवं रूप घेऊन आली आहे. फ्रेश स्ट्राइप्स, गोल्डन विंगमार्क एम्बलेम किंवा टँक टॉपवरील सेलिब्रेशन एडिशन लोगो यांसह सुसज्ज करण्यात आलेली नवी एडिशन आपली प्रीमियम स्टाइल व मूल्यवर्धित वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आली आहे.
नवे सॅडल ब्राउन सीट्स अभिरूचीपूर्ण आणि रायडरसाठी अभिमानाचा विषय ठरतील. गाडीचे मॅट अक्सिस ग्रे मेटॅलिक मफलर कव्हर, साइड कव्हर्सवरील सोनेरी मुलामा आणि पुढील बाजूला देण्यात आलेले नवे गोल्डन गार्निश उत्सवाचा दिमाख द्विगुणित करतील.
किंमत आणि उपलब्धता
शाइन सेलिब्रेशन एडिशन मॅट स्टील ब्लॅक मेटॅलिक आणि मॅट सांगरिया रेड मेटॅलिक अशा दोन आकर्षक रंगांत व ड्रम तसेच डिस्क या दोन प्रकारांत उपलब्ध करण्यात आली आहे. तिची किंमत रू. INR 78,878 (एक्स शोरूम – नवी दिल्ली) आहे.