पुणे- : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 69.08 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.
मतदारसंघनिहाय औरंगाबाद पदवीधर 61.08 टक्के, पुणे पदवीधर 50.30 टक्के, नागपूर पदवीधर 54.76 टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ
जिल्हा : कोल्हापूर
पदवीधर मतदार संघ मतदान
(एकूण मतदान केंद्रे: २०५)
पुरुष पदवीधर मतदार: ६२७०९
स्त्री पदवीधर मतदार: २६८२०
एकूण पदवीधर मतदार: ८९५२९
सकाळी ८ ते मतदान बंद होईपर्यंत कालावधीत झालेले मतदान
पुरुष: ४५५१५
स्त्री :१५४४९
एकूण :६०९६४
मतदान टक्केवारी :६८.०९ %
शिक्षक मतदार संघ मतदान (एकूण मतदान केंद्रे: ७६)
पुरुष शिक्षक मतदार: ८८७९
स्त्री शिक्षक मतदार :३३५८
एकूण शिक्षक मतदार: १२२३७
सकाळी ८ ते मतदान बंद होईपर्यंत कालावधीत झालेले मतदान
पुरुष: ७९८०
स्त्री : २६२९
एकूण : १०६०९
मतदान टक्केवारी:८६.७७ %
कुठे किती मतदान ?
कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले. त्याखालोखाल पुण्यात मतदान झाले. सायंकाळी चार वाजेपर्यंत 2 लाख 11 हजार 96 मतदारांनी मतदान केले होते. चार वाजेपर्यंत पुणे पदवीधरमध्ये 49.52 टक्के तर शिक्षकसाठी 67.36 % मतदान झाले.
औरंगाबादमधून सतीश चव्हाण राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्यासमोर भाजपचे शिरीष बोराळकरांचे आव्हान आहे. भाजपचे बंडखोर उमदेवार रमेश पोकळे यांचा फटका कुणाला बसणार हे पाहावे लागणार आहे.औरंगाबाद पदवीधर मतदार संघात सुमारे 61 टक्के मतदान झाले.
नागपूर पदवीधर मतदारसंघात सायंकाळी 4 वाजेपर्यंत 53.64 टक्के मतदान झाले. नागपूरमधून भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत झाली.
शिक्षक मतदारसंघात मतदानाची टक्केवारी अधिक
पदवीधर मतदारसंघाच्या तुलनेत शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची टक्केवारी अधिक राहिली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकात संध्याकाळी पाच पर्यंत 82.91 टक्के मतदान झाले. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे आणि भाजपचे नितीन धांडे यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे.
धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी 5 वाजेपर्यंत 99.31% मतदान झाले.