मुंबई- गणेशोत्सव काळात संपूर्ण मुंबई मध्ये भाजपा मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा जी यांच्या मार्गदर्शनाखाली” गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२१” घरगुती पर्यावरणपूरक, सार्वजनिक मंडळाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक विभागात ३ बक्षिसे व ४ उत्कृष्ट कलाकृती बक्षिसे देण्यात आली. सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष अरूण दळवी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा मुंबई कार्यलयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात गणेशोत्सव सजावट स्पर्धा- २०२१ च्या विजेत्यांना गौरविण्यात आले. बक्षिस समारंभ भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, भाजपा मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांच्या हस्ते पार पडला.
या स्पर्धेत एकूण ३६,००० हून अधिक गणेशभक्तांनी, १,२५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि २३,५०० घरगुती गणेश सजावट, ८००० घरगुती पर्यावरणप्रेमींनी यांनी आपला सहभाग नोंदवला होता. गणेशोत्सव सजावट स्पर्धा- २०२१ च्या अंतर्गत घरगुती स्पर्धा ज्यामध्ये गिरगावातील विजय ठकार, लालबाग नितीन व्यास, गोरेगाव मोहिती नेगांधी यांना विजेते म्हणून गौरविण्यात आले. तसेच पर्यावरणपूरक “घरगुती स्पर्धा – २०२१” मध्ये विलेपार्लेतील मनीष सावंत व कांदिवली येथील दक्ष मेहता, आग्रीपाडा येथील मितेश खामकर यांना गौरविण्यात आले. घरगुती सर्वात्कृष्ट कलाकृती स्पर्धा विजेते २०२१ मध्ये पराग सावंत – परेल येथून असून फ्रॅक्लिन पॉल – प्रतीक्षा नगर, राहुल वरिस – घाटकोपर, शिवानी मजमुदार – अंधेरी अशी विजेत्याची नावे आहेत.
यावेळी रोहिदास लोखंड़े, विकास माने, विवेक भाटकर, सुर्यकांत होताळकर, संजय दास्ताने, पदमाकर कुवेसकर, दीपक राव राणे, पदमाकर कुवेस्कर, विश्वनाथ तोरसकर, विकास सावंत, सुरेस सरनोबत, विवेक मुळे, अजय पोलेकर आदी उपस्थित होते.