आज रात्रीपासून सोशल मीडिया युजर्स फेसबुक,आणि व्हॉट्सअँपचा युज करण्यास असमर्थ झाले आहेत. अचानक या तीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने काम करणं बंद केलं आहे. आता यावर, ट्विटरवर फेसबुक आणि व्हाटसेप ने म्हटले आहे कि,’ आम्हाला माहिती आहे की काही लोकांना आमच्या अॅप्स आणि उत्पादनांमध्ये प्रवेश करण्यात समस्या येत आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर गोष्टी पूर्ववत करण्यासाठी काम करत आहोत आणि कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
अनेक वेबसाइट्सवर ट्राफिक ट्रॅक करणाऱ्या Downdetector.com ने असेही म्हटले आहे की, मोठ्या संख्येने लोक व्हॉट्सअँप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरण्यास असमर्थ आहेत. बरेच लोक तक्रार करतात की ते या ऍप्सच्या माध्यमातून संदेश पाठवू शकत नाहीत किंवा वापरू शकत नाहीत.