वावरहिरे- वावरहिरे गावातील शंभु डोहा मध्ये दि.21.2.2020 महाशिवरात्रि दिनी दुपारी 4.30 वाजता मयुर प्रमोद गुरव वय 28 वर्षे हा पाणलिंग मंदिर देवपूजा साठी पाणी आणनेसाठी गेला असता तोल जावून 20 पुट खोली असलेल्या डोहात कड़ेला बुडी घेताना अचानक घसरून पडला त्यास पोहता येत नव्हते.त्याला बुडताना गावातील एक महिला सौ सविता धोत्रे यांनी पाहिले. सौ.धोत्रे यांनी मयुरला वाचविन्यासाठी मोठ्याने आरडा ओरड करून मदतीची याचना केली त्याला साद देऊन जीवाची परवा न करता शुभम प्रकाश भोसले इ.12 वी दहीवडी कॉलेज ,दहीवडी च्या मुलाने वय वर्षे 17 याने शंभु डोहात जीवाची परवा न करता उड़ी मारून बुडलेल्या मयुर गुरवला पकडून कमी पाण्याचे बाजूने बाहेर काढले.त्यावेळी गावातील राजू मुळे फोटोग्राफर ने मदतीला धावून मयुरच्या पोटात गेलेले पाणी बाहेर काढले. 7 मिनीटाचे या थरार नाटयांतून जीव वाचविला म्हणून मुयर च्या कुटुबियाकडून तसेच वावरहिरे पंचक्रोशीतुन या तिघांचे कौतुक होत होते.या तिघानी मुयर चा जीव वाचविला म्हणून ग्रामस्थाचे व गुरव कुटुबियांचे वतीने महाशिवरात्रि च्या समारोप यात्रे दिवशी 23.2.2020 रोजी रात्री सरपंच चन्द्रकांत वाघ यांचे शुभहस्ते शुभम भोंसले,सौ.सविता धोत्रे आणि राजू मुळे यांचा संपूर्ण पोशाख ,फेटा बांधून यात्रा कमिटी तर्फे प्रत्येकी 500 रू. रोख बक्षीस देऊन सन्मान केला यावेळी यात्रा कमिटी प्रमुख उत्तम अवघडे, फुले एज्युकेशनल सोशल फॉउंडेशन चे अध्यक्ष रघुनाथ ढोक,मोहन सुतार, विश्वास पांढरे उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व घड़लेल्या घटनेचा प्रसंग तुलशीराम यादव यांनी कथन करून उभा केल्याने त्यावेळी जमलेला सर्व जनसमुदाय भावनिक झाला.सध्याचे मुलानी सर्वगुण संपन्न असले पाहिजे असा सुर निघाला.सरपंच वाघ यांनी शुभम,सौ. सविता ,राजू मुळे यांचे सारखे मदतीला धावून आले पाहिजे असे म्हंटले.