नवी दिल्ली, दि. १९ : देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त निधी पांडे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.