एक लाखांहून जास्त किंमत असेलला लॅपटॉप तुम्हाला अर्ध्या किंमतीत म्हणजेच फक्त ५० हजार रुपयाच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे, या सेलमध्ये ग्राहकांना अनेक प्रोडक्ट्सवर सूट दिली जात आहे. परंतु, आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी या इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट सारख्या लॅपटॉपवर मिळत असलेल्या डिस्काउंटसंबंधी माहिती देत आहोत. xxxxवरचा हा सेल १७ जून पर्यंत लाइव्ह असणार आहे. या प्रोडक्टवर डिस्काउंट शिवाय, शॉपिंग करताना तुम्ही अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड किंवा पेटीएम वॉलेट किंवा यूपीआय ट्रान्झॅक्शन द्वारे पेमेंट करीत असल्यास १० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल…….असा प्रचार काही माध्यमांमधून होत आहे , मुळातच अशा सर्व प्रोडक्ट्सच्या किंमती वाढवून आणि त्यावर डिस्काऊंट दाखवूनही हे प्रोडक्ट्स महागातच पडत असल्याचे निदर्शनास येत आहेत . केवळ या वेबसाईटवर लोकांनी जावे म्हणून अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे . तेव्हा ग्राहक राजा सावधान … काहीही खरेदी करताना लोभाला मोहाला बळी पडू नका व्यवस्थित खातरजमा करा आणि मगच व्यवहार करा असे आवाहन आम्ही आपणास करत आहोत .