मुंबई-गेल्या 24 तासांत अमेरिका, फ्रान्स आणि ब्राझील देशांमध्येच फक्त महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्रात जगात चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
महाराष्ट्रात फेब्रुवारीपासून 400 टक्के रुग्ण जास्त आढळले
गुरुवारी देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 8,646 प्रकरणे आढळली. मार्च महिन्यात मुंबईमध्ये कोरोनाचे 88,710 नवीन प्रकरणे समोर आली. जे फेब्रुवारीच्या तुलनेत 475 % जास्त आहे. या दरम्यान 216 लोकांचा जीव गेला जो फेब्रुवारीच्या तुलनेत 181% जास्त आहे. तर संपूर्ण राज्यात 6.6 लाखांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्णांची प्रकरणे समोर आली जी फेब्रुवारीच्या तुलनेत 400% जास्त आहेत.
महाराष्ट्रातील सात दिवसांतील रुग्ण
तारीख | पॉझिटिव्ह रुग्ण |
26 मार्च | 36902 |
27 मार्च | 35726 |
28 मार्च | 40414 |
29 मार्च | 31643 |
30 मार्च | 27918 |
31 मार्च | 39544 |
1 एप्रिल | 43,183 |
कोरोनाच्या या भीषण आकडेवारीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी पाच वाजता ‘वर्षा’ बंगल्यावर आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जाईल. कोरोना रोखण्यासाठी कडक निर्बंध घालण्याबाबत निर्णयदेखील घेतले जाऊ शकतात. त्याचवेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत. या बैठकीनंतर राज्यात लॉकडाऊन बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.