मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढती रुग्णसंख्या सध्या चिंतेचा विषय असून कोरोनाचा सामना राज्य सरकार कसा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनच्या तयारीचे निर्देश देऊन प्रशासन व जनतेची मानसिकता यावर मंथन सुरु केले असताना महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने लॉकडाऊनला जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. राज्यात कडक निर्बंध लावावेत असा सरकारमध्ये सूर आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोनावर सायंकाळी पाच वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर उद्धव ठाकरे रात्री ८.३० वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. यावेळी राज्यात कोरोणाचा सामना कसा केला जाईल हे ठाकरे सांगतील अशी सर्वांना अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री आज जनतेशी संवाद साधणार…
About the author

SHARAD LONKAR
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/