मुंबई-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते. मात्र औरंगाबादमध्ये असताना ते मध्येच दिल्लीला रवाना झाले आहेत. औरंगाबादची सभा आटोपून त्यांनी दिल्लीला प्रयाण केले आहे. एका महिन्यातील त्यांचा हा सहावा दिल्ली दौरा आहे. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे.राज्यात सत्तांतर होऊन साधारण एक महिना उलटला आहे. मात्र अद्याप शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. याच मंत्रिमंडळ विस्तारावर मागील काही दिवासांपासून भाजपाचे दिल्लीमधील वरिष्ठ नेते आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा सुरु आहे. शिंदे महिन्याभरात आतापर्यंत एकूण पाच वेळा दिल्लीला जाऊन आले आहेत. असे असताना आजदेखील ते औरंगाबादचा दौरा आटोपून पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर निघाले आहेत.