वॉशिंग्टन:: करोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेनं जागतिक आरोग्य संघटनेशी (WHO) असलेले सर्व संबंध तोडले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी यासंबंधीची घोषणा केली. जागतिक आरोग्य संघटनेवर संपूर्णपणे चीनचं नियंत्रण आहे. त्यामुळं या संघटनेशी अमेरिकेनं आपले सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे, असं ट्रम्प म्हणाले यांनी यासंबंधीची घोषणा केली. जागतिक आरोग्य संघटनेवर संपूर्णपणे चीनचं नियंत्रण आहे. त्यामुळं या संघटनेशी अमेरिकेनं आपले सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे, असं ट्रम्प म्हणाले.जगभरात करोना विषाणूमुळं झालेल्या मृत्यूंना जागतिक आरोग्य संघटना आणि चीनला दोषी ठरवलं आहे. वर्षाला केवळ ४० दशलक्ष डॉलर इतकी मदत देत असतानाही WHO वर चीनचं संपूर्णपणे नियंत्रण आहे. दुसरीकडे अमेरिकात्या तुलनेत वर्षाला ४५ कोटी डॉलरची मदत देत आहे. तरीही संघटना आवश्यक सुधारणा करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळं आज आम्ही या संघटनेसोबत असलेले संबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय घेत आहोत, असं ट्रम्प यांनी सांगितलं.
जागतिक आरोग्य संघटनेचा रोखण्यात आलेला निधी आता जगातील इतर आरोग्य संघटनांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे, असं सांगतानाच, ट्रम्प यांनी चीनविरोधात घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांची यावेळी घोषणा केली.
करोना चीनचा वुहान व्हायरस असल्याचं यावेळी ट्रम्प म्हणाले. चीननं हा वुहान व्हायरस जगभरात फैलावला. त्यामुळं जागतिक महामारीचं संकट कोसळलं. या व्हायरसनं एक लाखाहून अधिक अमेरिकी नागरिकांचा बळी घेतला. संपूर्ण जगभरात लाखो नागरिकांचा या व्हायरसनं जीव घेतला, असं ट्रम्प म्हणाले.