नवी दिल्ली -जम्मूत गुरुवारच्या रात्री पारा उणे-१०, श्रीनगर उणे-५.६ अंशावर हाेता. उत्तराखंडमध्ये पारा शून्याच्याही खाली हाेता.जम्मू-काश्मीरमध्ये थंडी पडत आहे. अलिकडे,शुक्रवारी उन पडले पण थंडी तशीच राहिली. इतर राज्यातून येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये उत्साह दिसून येत होता .दिवसभर जम्मू विभागात हलकी ढगाळ वातावरण होते.
काश्मीरमध्ये तलाव व तलावांचा वरचा थर गोठला आहे, नवीन वर्ष साजरा करन्यास आलेल्या पर्यटकांमध्ये
उत्साह ओसंडून वाहतो आहे. दोन दशकांतील ही पहिलीच वेळ आहे जेव्हा डिसेंबरमध्ये आठवड्यातून जम्मूमध्ये दिवसाचे तापमानसामान्यपेक्षा सहा ते दहा डिग्री खाली गेले आहे.
गेल्या दाेन दिवसांपासून शिखरांवर हाेत असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम देशातील मैदानी राज्यांत दिसू लागला आहे. थंडीच्या लाटेमुळे कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. आगामी ४८ तासांत या वातावरणापासून दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. ३१ डिसेंबर व १ जानेवारीला गारांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार संपूर्ण हरियाणा, चंदिगड, दिल्ली, उत्तर राजस्थान, बिहारसह पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आेडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीमच्या काही भागात दाेन दिवसांत हुडहुडी भरणारी थंडी पडेल. ३१ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत संपूर्ण पूर्व व मध्य भारतात पावसासाेबत गारा पडण्याची शक्यता आहे. पूर्व भारतात २ जानेवारीपर्यंत थंडी ठाण मांडून राहील. त्याशिवाय आगामी तीन दिवस या भागात दाट धुकेही पसरू शकते. मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, सिक्कीम व आेडिशातही दाेन दिवस धुक्याचे साम्राज्य दिसेल. ३० डिसेंबरनंतर ४-५ दिवसांपर्यंत ईशान्येकडील भागात धुके दिसून येईल.
किनारी भागात पाऊस : हवामान विभागानुसार उत्तर अफगाणिस्तानच्या वरील भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे. हवामानातील ही प्रणाली ३० डिसेंबरपासून पश्चिम हिमालयावर प्रभाव टाकू शकते. पूर्व आसाममध्ये वादळी वाऱ्याचे क्षेत्र तयार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक व आेडिशाच्या किनारपट्टीवर पाऊस हाेऊ शकताे. ईशान्येकडील काही राज्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस हाेऊ शकताे.