मुंबई दि. 14 : पुणे येथील डॉ.डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठास पदव्युत्तर भौतिकोपचार अभ्यासक्रम आणि प्रवेशक्षमतेत वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सन 2020-21 पासून ही मान्यता देण्यात आली आहे.
मस्क्युस्केलेटल सायन्सेसची प्रवेशक्षमता 4 वरुन 6, न्युरोसायन्सेसची प्रवेशक्षमता 4 वरुन 6, कार्डिओ रेस्पीरेटरी फिजोओथेरपीची प्रवेशक्षमता 4 वरुन 6, जनरल कम्युनिटी बेस्ड रिहॅबिलिटेशनची प्रवेशक्षमता 4 वरुन 6 अशी वाढविण्यात आली आहे. तर एमपीटीएच (मसक्युस्केलेटल सायन्सेस अँड स्पोर्टस) प्रवेशक्षमता 3, एमपीटीएच (मस्क्युस्केलेटल सायन्सेस अँड हँड कंडीशन) प्रवेशक्षमता 3 आणि एमपीटीएच (मसक्युस्केलेटल सायन्सेस अँड मॅन्युअल थेरपी) प्रवेशक्षमता 3 करण्यात आली आहे
सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने भौतिकोपचार अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, 1987 मधील तरतुदींचे संस्थेने काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.