स्पेशल मुलांसाठी फॅशन शो!
लिओ क्लब आणि लायन्स क्लब ऑफ जुहूतर्फे स्पेशल मुलांसाठी फॅशन शो हा नवीन उपक्रम आयोजित करण्यात आला होता. स्पेशल मुले आणि युवक हे जुहू येथील लायन्स क्लबच्या अगदी जवळीकतेचा विषय आहेत.
ऑडियोलॉजिस्ट-स्पीच थेरेपिस्ट लायन देवंगी दलाल ह्यांनी हयात रेजेंसी, मुंबई, द्वारे समर्थित या विलक्षण अशा कार्यक्रमाच्या आयोजन आणि अमंलबजावणीची महत्त्वाची धुरा हाती घेतली होती. जोश फाऊंडेशनने पाठबळलेली साधना विद्यालयातील कर्णबधिर मुले, दिलकुश मधील मानसिक अपंग मुले, लिटल एंजेल स्कूलमधील शारीरिक अपंग मुले(खार) एनएबीद्वारा समर्थित अंध मुलींनी आदिती शर्मा, राहुल शर्मा, रिषिना कंधारी, शादाब फरीदी, मनीषा सक्सेना, किरण राजपूत यांसारख्या ख्यातनाम व्यक्ती आणि क्लबच्या सदस्यांबरोबर रॅम्प वॉक केला. ख्यातनाम डिझायनर आशिष ड्वायर याने या रॅम्प वॉकचे दिग्दर्शन व कपडे डिझाईन केले होते.
“चला त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्याशी निगडित मिथक आणि गैरसमज दूर करूया. त्यांची क्षमता वाढवून त्यांना एक गुणवत्तापूर्ण जीवन देऊया. त्यांच्याकडून जीवन आनंदाने जगण्याचे धडे शिकून त्यांच्यासारखे आव्हानांचा सामना करण्यास शिकूया. ते आपल्या समाजाचा एक भाग आहेत आणि त्यांच्यासाठी चांगले भविष्य निर्माण करण्यासाठी आपण एकत्र येऊ या.” – अध्यक्ष लायन राज वंकावाला , लायन राजेश रसानिया, ममता पारेख आणि ऋषिश शाह.
या स्पेशल मुलांनी सर्व विषमतांचा त्याग केला आहे आणि समाजातील अडथळे व मर्यादा दूर केल्या आहेत. या फॅशन शोद्वारे एक सामाजिक संदेश दिला जाईल जो या विलक्षण मुलांद्वारे परावर्तीत होईल. सेलिब्रिटीज आणि क्लबच्या सदस्यांबरोबर हातात हात घालून रॅम्प वॉक करणारी ही मुले कोनापेक्षाही कमी नसल्याचे हा फॅशन शो पाहिल्यावर जाणवते.
प्रत्येक व्यक्तीत, मग ती सामान्य असो वा अपंग तिच्यात क्षमता असते. आपल्याला त्यांना फक्त पारखण्याची गरज असते जेणेकरून ते सामान्य व्यक्तींप्रमाणे जगू शकतील. आजच्या जगात नैतिक समर्थन आणि सुरक्षा महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्तीला ‘आपल्यासाठी कोणीतरी आहे. ही भावना अधिक आत्मविश्वास वाढविणारी असते. हीच माझी विचार प्रक्रिया आहे.” – देवंगी दलाल.