मुंबई, :महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित एआयटीए एमएसएलटीए 14वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या फेरीत तेलंगणाच्या बिगरमानांकीत शौर्य समाला याने चौथ्या मानांकित छत्तीसगढच्या सम्प्रीत शर्माचा 9-4 असा सनसनाटी पराभव करून आजचा दिवस गाजवला.
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स व वुडहाऊस जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत मुलांच्या गटात क्वालिफायर महाराष्ट्राच्या अभिराम निलाखे याने आपलाच राज्य सहकारी नील जोगळेकरचा 9-4 असा पराभव करून आगेकूच केली. महाराष्ट्राच्या समर्थ सहिता याने आसामच्या वेद कलितावर 9-0 असा सहज विजय मिळवला. अर्णव पापरकर याने अंशीत देशपांडेला 9-2 असे सहज पराभूत केले. तामिळनाडूच्या अव्वल मानांकित प्रणव रेथीन आरएस याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या निव कोठारीचे आव्हान 9-2 असे संपुष्टात आणले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली(मुख्य ड्रॉ)फेरी: मुले:प्रणव रेथीन आरएस(तामिळनाडू)(1) वि.वि.निव कोठारी(महाराष्ट्र)9-2;
तेजस आहुजा(हरियाणा)(3) वि.वि.अक्षत धूल(हरियाणा) 9-1;
समर्थ सहिता(महाराष्ट्र) वि.वि.वेद कलिता(आसाम)9-0;
रयान कुथार्थ(केरळ) वि.वि.व्ही धीरज रेड्डी(तेलंगणा) 9-1;
अभिराम निलाखे(महाराष्ट्र)वि.वि.नील जोगळेकर(महाराष्ट्र) 9-4;
वेंकट बटलंकी(तेलंगणा)(6) वि.वि.प्रियांश बर्थवल(उत्तराखंड) 9-0;
सेंजम अश्वजीत(मणिपूर)(7) वि.वि.रिशीक वाविलापल्ली(तेलंगणा)9-1;
महालिंगम खांदवेल(तामिळनाडू)(5) वि.वि.विवान कारंडे(महाराष्ट्र) 9-1;
शौर्य समाला(तेलंगणा)वि.वि.सम्प्रीत शर्मा(छत्तीसगढ)(4) 9-4;
सिद्धांत शर्मा(हरियाणा)(8) आकांश सुब्रमणियन(गुजरात)9-3;
अर्णव पापरकर(महाराष्ट्र)वि.वि.अंशीत देशपांडे(महाराष्ट्र)9-2