पुणे-(शरद लोणकर )२१ जानेवारी २०२३: एअर इंडियाने एक आकर्षक उपक्रम सुरु केला आहे. भारताच्या ७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एअर इंडियाच्या संपूर्ण देशांतर्गत नेटवर्कमध्ये आकर्षक सूट दिली जात आहे.
आज सकाळपासून सुरु करण्यात आलेली ही ऑफर २३ जानेवारी २०२३ पर्यंत सुरु राहील. एअर इंडियाच्या सर्व बुकिंग प्लॅटफॉर्म्सवर तसेच एअर इंडियाच्या अधिकृत ट्रॅव्हल एजंट्सकडे देखील या सेलचा लाभ घेता येईल. डिस्काउंटेड तिकिटे इकॉनॉमी क्लासमध्ये उपलब्ध असतील आणि १ फेब्रुवारी ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत भारतामध्ये संपूर्ण देशांतर्गत नेटवर्कमध्ये प्रवासासाठी लागू असतील.
फक्त १७०५ रुपयांच्या अतिशय कमी वन-वे शुल्कापासून तब्बल ४९ पेक्षा जास्त देशांतर्गत ठिकाणच्या तिकिटांवर सूट दिली जात आहे. कुटुंबासोबत सुट्टीवर जाणे असो किंवा कामासाठी प्रवास करणे असो, एअर इंडियाच्या विशाल देशांतर्गत नेटवर्कमध्ये आकर्षक सूट योजनेचा लाभ मिळवता येईल.
देशांतर्गत नेटवर्कमधील काही वन-वे डिस्काउंटेड तिकीट शुल्क पुढीलप्रमाणे आहेत:
सेक्टर | सर्वसमावेशक तिकीट शुल्क (भारतीय रुपये) |
दिल्ली ते मुंबई | ५०७५ |
चेन्नई ते दिल्ली | ५८९५ |
बेंगळुरू ते मुंबई | २३१९ |
दिल्ली ते उदयपूर | ३६८० |
दिल्ली ते गोवा | ५६५६ |
दिल्ली ते पोर्ट ब्लेअर | ८६९० |
दिल्ली ते श्रीनगर | ३७३० |
अहमदाबाद ते मुंबई | १८०६ |
गोवा ते मुंबई | २८३० |
दिमापूर ते गुवाहाटी | १७८३ |
अधिक माहितीसाठी कृपया वेबसाईटवर लॉग इन करा www.airindia.in किंवा वर कॉल सेंटरशी संपर्क साधा – १८६० २३३ १४०७