- ग्राहकांना डिजिटल उत्पादने आणि सेवा पुरवण्याच्या बाबतीत एसबीआय आघाडीवर असून लेस कॅश भारताच्या निर्मितीसाठी मार्ग तयार करत आहे.
मुंबई – भारतातील सर्वात मोठी कर्ज पुरवठादार असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान (मेइटी) मंत्रालयाच्या डिजिटल पेमेंट स्कोअरबोर्डवर सलग तिसऱ्या महिन्यात आघाडीचे स्थान मिळवले आहे. हा स्कोअरबोर्ड विविध डिजिटल निकषांच्या जोरावर व्यावसायिक बँकांच्या कामगिरीचा मागोवा घेतो. एसबीआय ही आघाडीची रेमिटर बँक असून तिने ६४ कोटींच्या सर्वाधिक युपीआय व्यवहारांची नोंदणी केली आहे, तिचा तर ग्राहक वर्ग १३.५ कोटी आहे.
एसबीआयने आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून ६३६ कोटींचे व्यवहार केले असून त्याचा बँकेच्या एकूण व्यवहार संख्येतील वाटा ६७ टक्के आहे. मोबाइल बँकिंग क्षेत्रात संख्येच्या बाबतीत बँकेचा बाजारपेठेतील हिस्सा सुमारे २५ टक्के आहे. सिमिलरवेबनुसार एसबीआयची इंटरनेट बँकिंग सेवा – ऑनलाइनएसबीआय.एसबीआय बँकिंग क्रेडिटच्या ऑनलाइन ट्रॅफिकच्या बाबतीत आणि कर्ज विभागात पहिल्या क्रमांकावर असून तब्बल ८.५ कोटी ग्राहकांद्वारे त्याचा वापर केला जातो.
एसबीआयचा डिजिटल आणि लाइफस्टाइल प्लॅटफॉर्म योनोने डिजिटल कर्जप्रक्रिया आणखी सफाईदार केली आहे. योनोमुळे डिजिटल कर्जाला चालना मिळाली असून आर्थिक वर्षात (एप्रिल ते डिसेंबर २०२०) १५,९९६ कोटी रुपये रकमेच्या १० लाख वैयक्तिक कर्जांचे वाटप केले आहे. योनो कृषीच्या माध्यमातून आर्थिक वर्ष २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत १२,०३५ कोटी रुपयांच्या ७.८५ लाख कृषी सुवर्ण कर्जांचे वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ४२३० कोटी रुपयांच्या २.४२ लाख किसान क्रेडिट कार्ड खात्यांचे परीक्षण (ऑगस्ट- डिसेंबर २०२०) करण्यात आले आहे.
एसबीआय ही डेबिट कार्डांची सर्वात मोठी वितरक आहे. एसबीआयच्या ग्राहकांतर्फे २९ कोटी डेबिट कार्डांचा वापर केला जातो. कार्डाद्वारे केल्या जाणाऱ्या खर्चाच्याबाबतीत एसबीआयचा बाजारपेठेतील हिस्सा ३० टक्के आहे तर व्यवहारांच्या संख्येच्या बाबतीत बँकेचा वाटा २९ टक्के आहे. पेमेंट स्वीकृती पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या बाबतीत बँकेने लयबद्ध प्रगती केली आहे. विविध पेमेंट्स प्रकारांमधे ३१ लाख मर्चंट टचपॉइंट्स सुरू करण्यात आले असून त्यात – भीम युपीआय क्यूआर, भारत क्यूआर, भीम- आधार आणि पीओएस यांचा समावेश आहे. यापैकी सुमारे ५१ टक्के पेमेंट स्वीकृती पॉइंट्स ग्रामीण आणि निम- शहरी प्रदेशांमधे कार्यरत असून देशाच्या दुर्गम भागात व्यापारी वर्गाला वाव देण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाशी ते सुसंगत आहे.
बँकेची पेमेंट अग्रीगेटर सेवा – एसबीआयईपे – बँकेच्या मालकीचा पहिला आणि एकमेव अग्रीग्रेटर प्लॅटफॉर्म असून तो केंद्र सरकार खाती, स्वायत्त संस्था, राज्य सरकार अंडरटेकिंग्ज अशा सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या घटकांच्या डिजिटल पेमेंटविषयक उदयोन्मुख गरजा पूर्ण करतो तसेच खासगी क्षेत्रातील उद्योगांनाही सेवा देतो.