वाऱ्यावर स्वार व्हा’
दणकट, स्पोर्टी आणि अत्याधुनिक हॉर्नेट 2.0 द्वारे होंडाचे 180- 200 सीसी क्षेत्रात पदार्पण
अत्याधुनिक तंत्रज्ञान
· गोल्डन अपसाइड डाउन (युएसडी) फ्रंट फोर्क – 200 सीसी क्षेत्रातील पहिली सब
· अत्याधुनिक माहिती दर्शवणारे नवे पूर्णपणे डिजिटल निगेटिव्ह लिक्विड क्रिस्टल मीटर
· उत्कृष्ट नियंत्रणासाठी सिंगल चॅनेल एबेससह ड्युएल, पेटल डिस्क ब्रेक्स
· छोट्या स्टॉपदरम्यान सोयीस्कर ठरणारा नवा इंजिन स्टॉप स्विच
· विस्तीर्ण ट्यूबलेस टायर्स (पुढील 110 एमएम आणि मागे 140एमएम)
· कमी दृश्यमानता असल्यास आपत्कालीन स्टॉपसाठी हझार्ड स्विच
जबरदस्त कामगिरी
· नवे ताकदवान आणि कार्यक्षम 184 सीसी एचईटी बीएसव्हीआय पीजीएम- एफआय इंजिन, या विभागातील आघाडीच्या मध्यम श्रेणीच्या टॉर्कसह
· नवे उच्च दर्जाचे एयरोडायनॅमिक डिझाइन जे अधिक सफाईदार हाताळणीस मदत करते
आंतरराष्ट्रीय मजबूत शैली
वजनदार टाकीसह आक्रमक, पुढे झुकणारे डिझाइन जे वर्चस्वाची भावना निर्माण करते
पोझिशन लॅम्पसह नवा एलईडी हेडलॅम्प, नवे एलईडी विंकर्स आणि एक्स आकाराचे एलईडी टेल लॅम्प जे विसंबून राहाण्याची क्षमता आणि अधिक चांगली दृश्यमानता देतात
टाकीवर किल्लीची सोय असल्यामुळे जास्त सोयीस्करपणा तसेच दिसायला आकर्षक
ग्राहकासाठी खास मूल्य
खास सहा वर्षांचे वॉरंटी पॅकेज, हॉर्नेट 2.0 वर
आकर्षक किंमत रू. 126,345 एक्स- शोरूम गुरुग्राम (हरियाणा)
नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2020 – होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया प्रा. लि. ने आज आपल्या दणकट, स्पोर्टी आणि अत्याधुनिक हॉर्नेट 2.0सह 180- 200 मोटरसायकल क्षेत्रात प्रवेश केला आहे. आंतरराष्ट्रीय स्ट्रीट फायटर या संकल्पनेसह विकसित करण्यात आलेली ही मोटरसायकल अतिशय चपळ असून त्याला डिझाइन कोड्समधील अत्याधुनिक वैशिष्ट्यांची जोड देण्यात आली आहे, तर ‘बिल्ट टु परफॉर्म’ ही तिची वृत्ती अभिजातता दर्शवते.
या लाँचविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे व्यस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘नव्या युगातल्या ग्राहकांची स्वप्ने आणि रायडिंगविषीयी त्यांच्यात असलेली पॅशन यांपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आलेली नवी होंडा हॉर्नेट 2.0 सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जबरदस्त कामगिरीच्या मदतीने नवी हॉर्नेट 2.0 तरुण मोटरसायकलप्रेमींमधअये नवा मापदंड तयार करण्यासाठी सज्ज आहे. हे लाँच होंडाच्या श्रेणी विस्तार योजनेची सुरुवात असून त्याद्वारे भारतातील मोठ्या ग्राहकवर्गाला सेवा दिली जाईल.’
नवी हॉर्नेट 2.0 सादर करताना होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या विक्री व विपणन विभागाचे संचालक श्री. यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘नव्या हॉर्नेट 2.0 मध्ये होंडाच्या रेसिंग डीएनएचे स्ट्रीट रायडिंगच्या थरारकतेमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. कामगिरी आणि स्टाइल या दोन्हीविषयी रायडरच्या गरजा एकाच मशिनमध्ये पूर्ण करणारे ताकदवान, उच्च क्षमता असलेले एचईटी बीएसव्हीआय इंजिन, गोल्ड युएसडी फ्रंट फोर्क्स, पूर्णपणे डिजिटल निगेटिव्ह लिक्विड क्रिस्टल मीटर, ड्युएल, पेटल डिस्क ब्रेक्स आणि आक्रमक डिझाइन यांसारखी या विभागातील सर्वोत्तम वैशिष्ट्ये रायडिंगचा एकंदर अनुभव उंचावतात. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, ज्यांना वाऱ्यावर स्वार व्हायचे आहे, त्यांच्यासाठी हॉर्नेट 2.0 अगदी योग्य आहे.’
अत्याधुनिक तंत्रज्ञान
ग्राहकांनी होंडा ब्रँडच्या नाविन्यपूर्ण निर्मितीवर नेहमी दाखवलेला विश्वास सार्थ करत नवी हॉर्नेट 2.0, 6 नव्या पेटंट अप्लिकेशन्ससह बनवण्यात आली आहे.
रस्त्यावर पूर्ण आनंद घेत गाडी चालवताना आवश्यक नियंत्रण मिळावे यासाठी सिंगल चॅनेल एबीएससह ड्युएल, पेटल डिस्क ब्रेक्स हॉर्नेट 2.0 मध्ये देण्यात आले आहेत. मोनो शॉक रियर सस्पेंशनमुळे रायडिंगचा विशेषतः कॉर्नरिंग करताना जबरदस्त अनुभव मिळतो, तर चांगले स्थैर्यही मिळते.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट इमेज यांचा संगम म्हणजेच गोल्डन अपसाइड डाउन (एसडी) फ्रंट फोर्क – पहिल्यांदाच 200 सब सेगमेंटमध्ये देण्यात आले आहे.
नव्या इंजिन स्टॉप स्विचमुळे छोट्या स्टॉपवर इंजिन सहजपणे बंद करता येते. त्याशिवाय कमी दृश्यमानता असल्यास हझार्ड स्विचच्या मदतीने चालकाला सुरक्षित राहाता येते.
विस्तारित ट्यूबलेस टायर्समुळे, पुढील चाक (110) आणि मागील चाक (140 एमएम) रस्त्यावर अधिक चांगली पकड मिळते आणि पर्यायाने चालकाचा आत्मविश्वास वाढतो.
नव्या पूर्णपणे डिजिटल निगेटिव्ह लिक्विड क्रिस्टल मीटरमध्ये गियर पोझिशन इंडिकेटर, सर्व्हिस ड्यू इंडिकेटर, बॅटरी व्होल्टमीटर यांसारखी माहिती दर्शवली जाते. हे मीटर अडस्ट करता येण्यासारखा ब्राइटनेस (पाच लेव्हलपर्यंत अडस्ट करता येण्यासारखा) देण्यात आला आहे. त्याशिवाय यात सील चेन देण्यात आली आहे, जी वारंवार अडस्ट करण्याची गरज पडत नाही व त्यामुळे देखभालीचा खर्च कमी होतो.
जबरदस्त कामगिरी
नव्या हॉर्नेट 2.0 मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाइन दिले आहे, ज्यांच्या मदतीने गाडीची कामगिरी उच्च दर्जाची होते. हॉर्नेट 2.0 ला नवे भारत स्टेज व्हीआय पालन करणारे उच्च क्षमता असलेले अत्याधुनिक 184 सीसी पीजीएम- एफआय एचईटी (होंडा इको तंत्रज्ञान) इंजिन बसवण्यात आले आह. पीजीएम- एफआय यंत्रणा 8 ऑनबोर्ड सेन्सर्सचा वापर करते, जे सातत्याने कार्यक्षमपणे इंधन आणि एयर मिक्शर वापरून चांगली कामगिरी व उच्च दर्जाची कार्यक्षमता देते.
ही गाडी वेगाच्या कोणत्याही स्थितीमध्ये इनटेकचा संपूर्ण वापर आणि एक्सॉस्ट भागांसह जबरदस्त अक्सलरेशन व जलद प्रतिसाद देते. जबरदस्त कामगिरीसाठी खास तयार करण्यात आलेली हॉर्नेट 2.0 या विभागातील आघाडीचा, मध्यम श्रेणी टॉर्क देते. रोलर रॉकर आर्ममुळे फ्रिक्शन नाश कमी होण्यास मदत होते व त्यामुळे जास्त सफाईदार पॉवर डिलीव्हरी मिळते. नव्या इंजिनला देण्यात आलेले पिस्टन कुलिंग जेट उष्णता शोषक महणून काम करते आणि पर्यायाने इंजिनची थर्मल कार्यक्षमता सुधारते व अधिक चांगली इंधन कार्यक्षमता अनुभवता येते.
आंतरराष्ट्रीय स्टाइल
एलईडी लाटिंग पॅकेजमुळे (एलईडी हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्प, एलईडी विंकर्स आणि एक्स आकाराचे एलईडी टेल लॅम्प ) विसंबून राहाण्याची क्षमता तसेच दृश्यमानता वाढते.
नव्या उच्च दर्जाच्या एयरोडायनॅमिक डिझाइनमुळे सफाईदार हाताळणी करता येते व त्यामुळे हायवे तसेच शहराअंतर्गत प्रवासासाठी परफेक्ट व ताकदवान जोडीदार मिळतो.
नवे स्पोर्टी सीट आणि किल्लीसाठी टाकीवर जागा केल्यामुळे स्ट्रीट फायटर लूक आणखी उठावदार होतोच, शिवाय चालकाटी जास्त सोय होते.
शॉर्ट मफलर आणि नव्या अलॉय व्हील डिझाइनमुळे स्पोर्टी लूक जास्त खुलून दिसतो, तर अलॉय फूट पेग्जमुळे एकंदर स्टाइलमध्ये भर पडते.
महत्त्वाची विश्वासार्हता
या क्षेत्रात पहिल्यांदाच होंडाद्वारे 6 वर्षांचे वॉरंटी पॅकेज (3 वर्षांची नेहीची + 3 वर्षांची पर्यायी विस्तारित वॉरंटी) हॉर्नेट 2.0 वर देण्यात आले आहे.
किंमत आणि रंग
नवी हॉर्नेट 2.0 पर्ल इग्नियस ब्लॅक, मॅट सांग्रिया, रेडम टॅलिक, मॅट अक्सिस ग्रे मेटॅलिक आणि मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक या चार आकर्षक रंगांत उपलब्ध आहे. हॉर्नेट 2.0 ची किंतमत रू. 126,345 एक्स- शोरूम गुरुग्राम (हरियाणा) आहे.