आयडीबीआय बँकेने कॉर्पोरेट ग्राहकांसाठी विशेषतः बीएफएसआय विभागातील ग्राहकांसाठी एनएसीएच सुविधेचे ई- एनएसीएच आणि बी- एनएसीएच हे दोन नवे प्रकार लाँच केले आहेत. यामुळे बँकेतर्फे कॉर्पोरेट ग्राहकांना वेब बेस्ड सोल्यूशन्स पुरवले जाणार असून त्याच्या मदतीने त्यांना विशिष्ट कालावधीनंतर आणि वारंवार केले जाणारे आंतरबँक, मोठ्या रकमेचे इलेक्ट्रॉनिक व्यवहार सहजपणे करता येणार आहेत. यानिमित्ताने बँकेने आपल्या कॉर्पोरेट ग्राहकांसाठीच्या डिजिटल उत्पादनश्रेणीत आणखी एक उत्पादन समाविष्ट केले आहे. बँकेने नुकतेच फास्टॅग उत्पादन लाँच केले आहे, ज्यामुळे महामार्गावर संपर्कविरहीत पद्धतीने टोल भरता येतो. बँक आपल्या ग्राहकांसाठी जास्तीत जास्त डिजिटले उत्पादने लाँच करण्यासाठी आणि ग्राहकांना त्यांच्या सोयीने बँकिंग सेवांचा पूर्ण वापर करणे शक्य करण्यासाठी बांधील आहे.
लाँचप्रसंगी व्यवस्थापकीय सांचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राकेश शर्मा म्हणाले, ‘उद्योगक्षेत्रांसाठी त्यांच्या गरजेप्रमाणे उत्पादने बनवणे आणि ग्राहक अनुभव उंचावणे ही काळाची गरज झाली आहे. ग्राहककेंद्री बँक या नात्याने आम्ही ग्राहक सेवा वितरण प्रक्रियेतील पोकळी भरून काढणे आणि अशा प्रकारची उत्पादने लाँच करून सातत्याने ग्राहक समाधानावर काम करत राहाणे महत्त्वाचे आहे.’
आयडीबीआय बँक अग्रेसर बँकांपैकी एक असून 2001 मध्ये भारतात कॅश सर्व्हिस मॅनेजमेंट सर्व्हिसेसची (सीएमएस) सुरुवात करणाऱ्या काही बँकांपैकी एक आहे. बँकेकडे स्वतःचा सीएमएस व्यवहार देखरेख आणि कामकाज विभाग असून तो मुंबईतील बेलापूर येथे कार्यरत आहे. बँकेद्वारे कॉर्पोरेट ग्राहकांना नव्या युगाशी सुसंगत सीएमएस उत्पादने उपलब्ध करून दिली जातात व त्यात एपीआय पॉवर्ड डायनॅमिक व्हर्च्युअल अकाउंट्स, होस्ट-टु-होस्ट, फआस्टॅग, अक्वायरिंग सोल्यूशन्स, बल्क पेमेंट्स मोड्यूल, ई- फ्रेट आणि बीबीपीएस इत्यादींचा समावेश आहे.