· ही सुविधा देणारी देशातील पहिली बँक
· जगभरातील मान्यताप्राप्त कॉलेज व विद्यापिठे यांच्यासाठी उपलब्ध
· पूर्णतः डिजिटल प्रक्रिया
मुंबई: आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांना स्वतःला किंवा त्यांच्या मुलांना, भावंडांना व नातवंडांना जगभरातील मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी 1 कोटी रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळावे, यासाठी इन्स्टंट सँक्शन लेटर देणारी सुविधा आज जाहीर केली आहे. ‘इन्स्टा एज्युकेशन लोन’ नावाने असणारी ही पहिलीवहिली सुविधा लाखो पूर्व-मान्यताप्राप्त ग्राहकांना बँकेकडे असलेल्या त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर पूर्णतः डिजिटल पद्धतीने शैक्षणिक कर्ज देणार आहे. प्रवेशाची खातरजमा करण्यासाठी ग्राहकांना शैक्षणिक संस्थेमध्ये सँक्शन लेटर सादर करता येऊ शकते.
ग्राहकांना बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर करून स्वतःचे सँक्शन लेटर स्वतःच तयार करण्याची सेवा दिली जाणार असल्याने ‘इन्स्टा एज्युकेशन लोन’ सुविधा ग्राहकांसाठी कमालीची सोयीस्कर ठरणार आहे. साधारतः ग्राहकांना शैक्षणिक कर्जाचे सँक्शन लेटर मिळण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो. तसेच, या सुविधेमुळे, बँकेच्या शाखेत जाण्याचा आणि सगळी कागदपत्रे सादर करण्याचा ग्राहकांचा त्रासही वाचणार आहे.
नव्या सेवेविषयी बोलताना, आयसीआयसीआय बँकेचे अनसिक्युअर्ड अॅसेट्सचे प्रमुख सुदीप्त रॉय यांनी सांगितले, “महत्त्वाकांक्षा बाळगलेल्या लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून, ग्राहकांनी बँकेत ठेवलेल्या फिक्स्ड डिपॉझिटवर शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी इस्टंट मंजुरी देऊन सँक्शन लेटर देताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही आर्थिक चिंता न करता कॉलेज किंवा विद्यापीठाची प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते. कोणतेही पेपरवर्क न करता, डिजिटल सुविधेच्या मदतीने विद्यार्थ्यां व पालकांना या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. या सुविधेमुळे, सँक्शन लेटर मिळण्यासाठी लागणारा कालावधी काही दिवसांवरून काही मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. ग्राहकांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेली रक्कम उभी करण्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट किंवा अन्य गुंतवणूक मोडीवा लागणार नसल्याने ही सुविधा त्यांच्यासाठी अतिशय सोयीची ठरणार आहे, असा विश्वास आहे”
‘इन्स्टा एज्युकेशन लोन’ची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत:
· इन्स्टंट मंजुरी: ग्राहकांना बँकेच्या शाखेत न जाता, तातडीने ईमेलद्वारे सँक्शन लेटर मिळेल.
· लवचिकता: ग्राहकांना त्यांची मुले, भावंडे, नातवंडे किंवा स्वतः यांच्यासाठी, बँकेकडे असलेल्या फिक्स्ड डिपॉझिटच्या 90% पर्यंतच्या रकमेच्या कर्जासाठी अर्ज करता येऊ शकतो.
· कर्जाची वैविध्यपूर्ण रक्कम: आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 10 लाख रुपये ते 1 कोटी रुपये या दरम्यान कर्ज उपलब्ध आहे. देशातील संस्थेमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 10 लाख रुपये ते 50 लाख रुपये या दरम्यान कर्ज उपलब्ध आहे.
· अर्ज करणे सुलभ: ग्राहकांना बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधेद्वारे कर्जाची रक्कम व 10 वर्षांपर्यंतचा परतफेडीचा कालावधी सहजपणे निवडता येऊ शकतो.
· करविषयक फायदे: ‘इन्स्टा एज्युकेशन लोन’च्या रकमेवर 8 वर्षांपर्यंत भरलेले संपूर्ण व्याज प्राप्तिकर अधिनियम, 1961 च्या कलम 80ई अंतर्गत वार्षिक करपात्र उत्पन्नातून कर वजावटीस पात्र आहे.
ग्राहकांनी पुढील काही टप्पे पूर्ण केल्यावर त्यांना मंजुरी मिळवता येऊ शकते:
1. लॉग इन: ग्राहकांना बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधेवर लॉग इन करता येईल आणि पूर्व-मंजुरी मिळालेली ऑफर पाहता येईल.
2. कर्जाबाबत तपशील देणे: त्यांनी कर्जाची रक्कम, परतफेडीचा कालावधी, कॉलेज किंवा विद्यापीठाचे नाव व अभ्यासासाठी येणारा खर्च असा तपशील देणे गरजेचे आहे. कॅल्क्युलेटर आपोआप इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंटची (ईएमआय) माहिती देईल.
3. विद्यार्थ्याचा तपशील देणे: ग्राहकांनी विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व विद्यार्थ्याशी असलेले नाते अशी माहिती द्यावी. तसेच, त्यांनी अंतिम ऑफर पाहून घ्यावी, अटी व शर्ती मान्य कराव्यात आणि त्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर आलेल्या वन टाइम पासवर्डद्वारे (ओटीपी) ऑथेंटिकेट करावे. त्यानंतर, प्रक्रिया शुल्क मिळाल्यानंतर लगेचच सँक्शन लेटर तयार केले जाईल.
4. सँक्शन लेटर मिळवणे: निश्चित केलेल्या रिलेशनशिप मॅनेजरची माहिती आणि हंगामी सँक्शन लेटर नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवले जाईल.
कर्जाचे अंतिम वितरण होण्यासाठी ग्राहकांनी सँक्शन लेटर असलेल्या ईमेलमध्ये नमूद केलेल्या रिलेशनशिप मॅनेजरशी संपर्क साधणे आवश्यक आहे. प्रवेशाचे पत्र, वित्तीय कागदपत्र व स्वाक्षरी अशी आवश्यक कागदपत्रे प्राप्त केल्यानंतर बँक शैक्षणिक संस्थांना कर्ज वितरित करेल. ग्राहकांनी आयसीआयसीआय बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन कागदपत्रे सादर करावीत.