घर खरेदी सुलभ करणारा अशा प्रकारचा एकमेव प्लॅटफॉर्म
● आवास अॅप/पोर्टलमुळे गृह खरेदीदार आणि विकासक यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित होण्यात मदत
● राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गृह खरेदीदारांसाठी अॅपल अॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध
नवी दिल्ली: क्रेडाइ या खासगी रिअल इस्टेट विकासकांच्या सर्वोच्च संघटनेने गृह खरेदीदारांसाठी निवासी मालमत्तांची खरेदी सुलभ व्हावी या उद्देशाने आज ‘क्रेडाइ आवास’ अॅप लाँच केले. या उपक्रमाच्या माध्यमातून संभाव्य गृह ग्राहकांना त्यांच्या पसंतीचे प्रकल्प शोधण्यासाठी व विकासकांशी थेट संपर्क साधण्यासाठी विश्वसनीय प्लॅटफॉर्म मिळावा असा क्रेडाइचा उद्देश आहे. हे अॅप अॅपल अॅप स्टोअर आणि प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येऊ शकेल आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही ग्राहकांना त्यांचा वापर करणे शक्य आहे.
छत्तीसगढचे माननीय वाहतूक, गृहनिर्माण, पर्यावरण, वन व कायदामंत्री श्री. मोहम्मद अकबर यांनी छत्तीसगढचे रेरा प्रमुख श्री. विवेक धांड यांच्यासह अॅप लाँच केले. माननीय गृहनिर्माण व शहर व्यवहार राज्यमंत्री श्री. हरदीप सिंग पुरी यांनी ४ नोव्हेंबर, २०१९ रोजी लखनौ येथे झालेल्या “पहिल्या राष्ट्रीय रेरा परिषदेत” या उपक्रमाची घोषणा केली होती.
आवास अॅप हा क्रेडाइ सदस्यांसाठी एक एक्स्लुजिव प्लॅटफॉर्म आहे. यावर २२० शहरांतील प्रकल्प दाखवले जातात. देशभरातील २०००० क्रेडाइ विकासकांचा सहभाग या प्लॅटफॉर्मवर दिसून येईल. ग्राहकांना विकासकांशी संपर्क साधण्यासाठी तसेच मालमत्तांची पाहणी करण्यासाठी हे एक वन–स्टॉप डेस्टिनेशन ठरेल.
क्रेडाइ आवास अॅप आणि पोर्टलचे लाभ:
– घर खरेदी करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावणार
– क्रेडाइच्या विश्वसनीय विकासक सदस्यांना व ग्राहकांना एका प्लॅटफॉर्मवर आणल्यामुळे ग्राहकांच्या हिताची काळजी घेतली जाणार, मध्यस्थ टाळले जाणार आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकतेची निश्चिती होणार
– विकासक व गृह खरेदीदार यांच्यातील विश्वास वाढणार
– रिअल इस्टेट क्षेत्रासाठी एक पारदर्शक परिसंस्था प्रस्थापित करण्यामध्ये मदत होणार; ग्राहक, विकासक, रेरा सदस्य आणि बिल्डर्स व वित्तपुरवठादारांसारखे अन्य सर्व संबंधित घटक एका प्लॅटफॉर्मवर आल्यास जागरूकता निर्माण करणे तसेच माहितीचा प्रसार सुलभ होणार
क्रेडाइचे चेअरमन जक्षय शाह म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या स्वीकारामुळे रिअॅलिटी क्षेत्र अधिक नियमित व कुशल झाले आहे. तंत्रज्ञानाची शक्ती वापरून विकासक व गृह खरेदीदार यांच्यातील विश्वास व पादर्शकता वाढवण्यासाठी क्रेडाइने सुरू केलेल्या अनेक उपक्रमांपैकी एक म्हणजे आवास अॅप होय. हा एक अनुभवात्मक आणि संवादात्मक प्लॅटफॉर्म आहे. यावरून ग्राहकांना आता मालमत्तेची संपूर्ण माहिती बघता येईल, माहितीपूर्ण निर्णय घेण्याची मुभा मिळेल आणि पर्यायाने गृह खरेदीचा अनुभव अत्यंत सुरळीत राहील. या अॅपमुळे विकासकांनाही त्यांच्या पूर्ण झालेल्या प्रकल्पांतील घरे वेगाने विकण्यास मदत होईल. घर खरेदीची भावना वाढीस लागण्यात हातभार लागेल. तंत्रज्ञानात्मक प्रगतीचा अवलंब करून भारतातील रिअॅलिटी क्षेत्राच्या वाढीस चालना देण्यासाठी क्रेडाइ बांधील आहे.”
क्रेडाइचे अध्यक्ष (राष्ट्रीय) सतीश मगर यावेळी म्हणाले, “क्रेडाइच्या आवास अॅपच्या शुभारंभाची घोषणा ‘क्रेडाइ है तो भरोसा है’ या वायद्यासह करताना आम्हाला आनंद होत आहे. रिअल इस्टेट क्षेत्र उत्क्रांत झाले असल्याने मोबाइल अॅप या क्षेत्रातील पारदर्शकता वाढवण्यात आणि विकासक व गृह खरेदीदार यांच्यातील विश्वास वाढवण्यात मदत करेल. हा प्लॅटफॉर्म भारतभरातील व परदेशातील ग्राहकांना त्यांच्या पसंतीचे प्रकल्प व विकास ओळखण्याची क्षमता देईल. तसेच या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची संदिग्धता राहणार नाही.”
“भारतातील रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासासाठी क्रेडाइ अविश्रांतपणे काम करत आहे आणि एक भक्कम पाया घालण्यात, उद्योगक्षेत्राची रूपांतरणात्मक व बहुआयामी वाढ निश्चित करण्यात हे अॅप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग रूपांतरणासाठी करून घेत आम्ही या मार्गावरून पुढे चालत राहू,” असे मगर पुढे म्हणाले.
क्रेडाइ विषयी: १९९९ मध्ये स्थापन झालेली कन्फडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही भारतातील खासगी रिअल इस्टेट विकासकांची सर्वोच्च संघटना आहे. देशभरातील २१ राज्यांतील २२० शहर शाखांमधील २०,००० विकासक संघटनेचे सदस्य आहेत. हा उद्योग अधिक संघटित व प्रगतीशील करण्यासाठी क्रेडाइने अपार कष्ट घेतले आहेत. यासाठी क्रेडाईने सरकारी प्रतिनिधी, धोरणकर्ते व गुंतवणूकदार यांच्यासोबत घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील नैतिक मापदंड व व्यवसाय पद्धती सुधारण्यासाठी क्रेडाइ काम करते. क्रेडाइच्या सर्व उपक्रमांना केंद्र व राज्य सरकारांनी उत्तमरित्या मान्यता दिली आहे.