हैदराबाद: झोयलो डिजिहेल्थ प्रायव्हेट लिमिटेड (झोयलो) हे भारतातील नवीन युगातील आरोग्यसेवा क्षेत्राच्या गाथेतील एक उदयोन्मुख नाव असून, या कंपनीने वैद्यकीय सेवेची मागणी करणारे व सेवा पुरवणारे यांना एकात्मिक, पारदर्शक प्लॅटफॉर्मवर एकत्र आणणाऱ्या एका क्रांतीकारी ऑनलाइन आरोग्यसेवा परिसंस्थेची रचना यशस्वीरित्या केली आहे. झोयलो हा भारतातील पहिला ऑफलाइन व ऑनलाइन एकात्मिक आरोग्यसेवा प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर सेवा पुरवठादारांचे विस्तृत जाळे असून भारतभरातील ६००हून अधिक ठिकाणी याद्वारे सर्व प्रकारच्या (३६० डिग्री) आरोग्यसेवा पुरवल्या जातात. अॅपचे ५००,०००हून अधिक डाउनलोड्स झाल्यामुळे झोयलो आता देशभरातील लोकांना सेवा देत आहे, त्यांना तंत्रज्ञानाच्या बळावर निरोगी आयुष्य जगण्याची मुभा देत आहे.
झोयलो डिजिहेल्थचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कुमार रेड्डी म्हणाले, “आरोग्यसेवा जीवनचक्रातील प्रत्येक घटकाला सक्षम करणे आणि अखंडित आरोग्यसेवा पुरवण्यासाठी पारदर्शक संवाद व माहितीचे आदानप्रदान शक्य करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. झोयलोने डिझाइन केलेल्या सर्वसमावेशक परिसंस्थेमुळे आरोग्यसेवेची मागणी करणारे, त्यासाठी पैसे मोजणारे, रुग्ण तसेच या गतीशील नेटवर्कमधील सर्वांना अचूक व कार्यक्षम सेवा मिळेल.” आज एखाद्या व्यक्तीला तिच्या सोशल प्रोफाइलला, प्रोफेशनल प्रोफाइलला, लाइफस्टाइल प्रोफाइलला केवायसी अॅक्सेस असतो आणि सोशल मीडियाच्या अॅप्सद्वारे केवायसीला अॅक्सेस असतो. मात्र, एखादी व्यक्ती कधीही, कोठूनही ऑनलाइन साधनांचा वापर करून तिची हेल्थ प्रोफाइल बघू शकत नाही. झोयलो व्यक्तीची ‘हेल्थ प्रोफाइल’ तयार करण्याच्या दिशेने काम करत आहे. हा आरोग्यसेवा परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक असेल आणि त्यात व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास, निदान, धोक्याचे मूल्यांकन आणि अन्य तपशील असतील. या महत्त्वपूर्ण माहितीला झटपट ऑनलाइन अॅक्सेस मिळाला तर व्यक्तीला कधीही अचूक व कार्यक्षम उपचार देणे शक्य होईल.
ऑनलाइन आणि ऑफलाइन सेवांच्या विस्तृत श्रेणीचे अलगीकरण म्हणजे आरोग्यसेवांची डिलिव्हरी सुलभ करण्याचा आणि या एकंदर प्रणालीचा दर्जा व कार्यक्षमता देण्याचा भाग आहे. आरोग्यसेवा क्षेत्रातील मूल्यवर्धन व व्यक्तीआधारित अनुभवाने अनेक यंत्रणांचे लक्ष वेधले आहे. यांमध्ये विमा कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि अन्य आरोग्यसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचा समावेश होतो. या कंपन्यांनी झोयलोसोबत भागीदारी करून त्यांच्या ग्राहकांना अर्थपूर्ण आरोग्यसेवा देण्यास सुरुवात केली आहे.
कंपन्यांसाठी कायमच मुसंडी मारण्याचे क्षेत्र राहिलेल्या प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा उपायांचा व्यक्तींना फायदा होत आहे. यामुळे संभाव्य जीवनशैली विकारांचे निदान लवकर होत आहे. विशेषत: उच्चरक्तदाब, मधुमेह, स्थूलत्व व कर्करोग या एनसीडींचा यात समावेश होतो. या सोल्युशनमुळे व्यक्तीला एक आरोग्यपूर्ण जीवनशैली स्वीकारण्यास मदत होणार आहे. ऑनलाइन सल्ल्यामुळे अंतराचा अडथळा दूर होणार आहे. स्पेशलाइझ्ड तसेच सुपर स्पेशलाइझ्ड डॉक्टर उपलब्ध नसलेल्या भागांत राहणाऱ्यांनाही देशातील सर्वोत्तम डॉक्टरांशी संवाद साधणे तसेच त्यांचा सल्ला व उपचार घेणे शक्य होणार आहे. ई-फार्मसी सेवा २५,००० ठिकाणी पोहोचून भारतभरात अस्सल दर्जाची औषधे पुरवणार आहे. झोयलोचे कॉर्पोरेट हेल्थ कार्ड कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्यविषयक सर्व गरजांसाठी वन स्टॉप सोल्युशन देऊ करते.
श्री. रेड्डी म्हणाले, “आम्ही व्यक्तीच्या आरोग्याच्या नोंदी ऑनलाइन ठेवण्यासाठी तसेच संपूर्ण आरोग्यसेवा परिसंस्था तयार करण्यासाठी सर्व डॉक्टरांना प्रॅक्टिस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर देऊ करत आहोत. आरोग्यसेवा परिसंस्थेची चाकोरी मोडण्याच्या आमच्या प्रयत्नांना विविध पुरस्कार व प्रमाणपत्रांच्या रूपाने मान्यता मिळत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. तंत्रज्ञानाची जोपासना करून आरोग्यसेवा पुरवणे सुलभ करणारा ब्रँड होण्याचे ध्येय आमच्यापुढे आहे.”
लोकांना हेल्थ प्रोफाइल तयार करण्यात मदत करणे तसेच वैद्यकीय इतिहासाचे ऑनलाइन व्यवस्थापन करण्यात मदत करण्याशिवाय झोयलो वैद्यकीय खर्च कमी करण्यासाठी, अचूक निदान करून घेण्यासाठी तसेच भारतभरात Healthcare@Homeच्या सोयीचा लाभ घेण्यासाठी मदत करणार आहे. झोयलो हे तुमच्या सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणारे एक अॅप आहे!
झोयलो विषयी:
झोयलो हा देशभरातील आरोग्यसेवांच्या संपूर्ण कक्षेतील वापरकर्त्यांना तंत्रज्ञानाची क्षमता वापरून जोडणारा ऑनलाइन आरोग्यसेवा प्लॅटफॉर्म आहे. हैदराबादस्थित हेल्थटेक व्हेंचर झोयलो आरोग्यसेवा क्षेत्रातील डिजिटल कायापालटाचे नेतृत्व करत आहे. आरोग्यसेवा पुरवण्याच्या तसेच उपलब्ध करून घेण्याच्या मार्गामध्ये ही कंपनी डिजिटल तंत्रज्ञानाचा चातुर्याने वापर करून बदल घडवून आणत आहे. त्याचवेळी आरोग्यसेवा क्षेत्रातील निश्चित मानक, मार्गदर्शक तत्त्वे व नियमांचे पालनही ही कंपनी करत आहे. यातील प्रमुख सेवांमध्ये डॉक्टरांची अपॉइंटमेट बुक करणे, निदानात्मक चाचण्या, प्रतिबंधात्मक आरोग्य व स्वास्थ्य पॅकेजेस, डॉक्टरांचा ऑनलाइन सल्ला, ई-फार्मसी सेवा, होम हेल्थकेअर, रुग्णालय उपचार पॅकेजेस, प्रॅक्टिस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, डिजिटल वैद्यकीय नोंदी, कॉर्पोरेट हेल्थ कार्ड, ऑनलाइट हेल्थ हब्ज आदींचा समावेश होतो.
आज झोयलोने ५०,०००हून अधिक डॉक्टर्स, ३०००हून अधिक रुग्णालये आणि भारतभरातील ६००हून अधिक निदान केंद्रे आपल्या नेटवर्कमध्ये आणली आहेत.