पुणे, – सध्याच्या कठीण काळात, संपूर्ण देश महामारीचा सामना करत असताना अक्सिस बँक या भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या खासगी बँकेने सर्वसामान्यांसाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून अक्सिस बँकेने तज्ज्ञांची एक टीम तयार केली आहे, जी बारामती आणि पुण्यातील 50 पेक्षा जास्त वय असलेल्या सर्व पोलिस अधिकारी आणि सरकारी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे स्क्रीनिंग करणार आहे. बारामतीमध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
अक्सिस बँकेचे अध्यक्ष आणि शाखा बँकिंग विभागाचे प्रमुख रवी नारायणन म्हणाले, ‘अक्सिस बँक देशभरातील विविध राज्यांतील नागरिकांना शक्य ती सर्व मदत करत आहे. आम्ही आता फ्रंटलाइन योद्ध्यांपर्यंतही पोहोचायचे ठरवले आहे, कारण ते आघाडीवर राहून या महामारीचा सामना करत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत बारामती व पुण्यात मिळून 600 स्क्रीनिंग्ज केली असून अजून काही स्क्रीनिंग केली जाणार आहेत. या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करेपर्यंत आम्ही अशाचप्रकारे समाजाच्या बरोबरीने उभे राहून सर्वांना मदत करत राहाणार आहोत.’
तज्ज्ञांची ही टीम आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक्स रे सीबीसी आणि इतर आवश्यक उपकरणांच्या मदतीने कोव्हिड- 19 चाचणीचे पूर्वव- स्क्रीनिंग करणार आहे. हा उपक्रम तालुका पोलिस आणि बारामती वैद्यकीय हॉस्पिटलाशी संबंधित आरोग्य क्षेत्रातील इतर फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे स्क्रीनिंग करणार आहे.
बँकेने बारामतीमध्ये खास व्हॅन तैनात केली असून पुण्यात जास्तीत जास्त अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या टेस्टिंगसाठी सर्वदृष्टीने सोयीस्कर ठिकाण निवडण्यात येत आहे. खास तयार करण्यात आलेल्या या व्हॅनमध्ये कोव्हिड- 19 चाचणीसाठी आवश्यक सर्व उपकरणे बसवण्यात आली आहेत.
अक्सिस बँकेबद्दल
अक्सिस बँक ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी बँक आहे. बँकेद्वारे मोठे व मध्यम कॉर्पोरेट्स, एसएमई, शेती व रिटेल व्यवसाय अशा विविध प्रकारच्या ग्राहकांना सर्व सेवा पुरवल्या जातात. 4415 देशांतर्गत शाखा (विस्तारित काउंटर्ससह) आणि 11,971 एटीएम्ससह 30 जून 2020 रोजी अक्सिस बँकेचे नेटवर्क 2559 केंद्रांत पसरलेले असून त्यामुळे विस्तारित उत्पादन श्रेणी व सेवांसह मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचणे बँकेला शक्य झाले आहे. अक्सिस समूहामध्ये अक्सिस म्युच्युअल फंड, अक्सिस सिक्युरीटीज लि., अक्सि फायनान्स, अक्सिस ट्रस्टी, अक्सिस कॅपिटल, ए. टीआरईडीएस लि., फ्रीचार्ज आणि अक्सिस बँक फाउंडेशन यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी https://www.axisbank.com/