मुंबई- भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या मुंबईथील घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील ‘अँटिलिया’ या त्यांच्या निवासस्थानाजवळ ही गाडी आढळली असून, मुंबई पोलीस आणि एसएसजीची सिक्युरिटी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबानी यांच्या घराबाहेर असलेल्या गाडीत जिलेटिनच्या कांड्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान, अंबानी यांच्या ताफ्यातील गाडीचा नंबर आणि स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा नंबर सारखाच असल्याची माहिती आहे.