34 बॉक्स घेऊन पहिली फ्लाइट पुण्यातून दिल्लीला रवाना, 13 शहरांमध्ये 56.5 लाख डोज पाठवतील
कोरोना व्हॅक्सीनचा पुरवठा आज सर्वप्रथम मंगळवारी सकाळी पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूमधून सुरु झाला . ज्या ट्रकमधून हे नेण्यात आले, त्याचे टम्परेचर तीन डिग्री ठेवण्यात आले. येथून व्हॅक्सीनचे 478 बॉक्स देशाच्या 13 शहरांमध्ये पोहोचवण्यात येतील. प्रत्येक बॉक्सचे वजन 32 किलो आहे. व्हॅक्सीनने भरलेले ट्रक रवाना करण्यापूर्वी सीरम इंस्टीट्यूमध्ये पूजा करण्यात आली.पहिल्या टप्प्यात अहमदाबाद, दिल्ली ,कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, करनाल, हैदराबाद, विजयवाडा, गुवाहाटी, लखनौ, चंडीगड आणि भुवनेश्वरमध्ये हवाई मार्गाने व्हॅक्सीन पोहोचवण्यात येईल. मुंबईमध्ये थेट ट्रकने व्हॅक्सीन पाठवण्यात येईल.
कोरोना व्हॅक्सीनची सर्वात प्रथम पुरवठा एअर इंडियाच्या फ्लाइटने गुजरातला पाठवण्यात येत आहे. गुजरातचे उप-मुख्यमंत्री नितिन पटेल यांनी सोमवारी सोशल मीडियावर सांगितले होते की, त्यांच्या राज्यात व्हॅक्सीनची सकाळी पावने अकरा वाजता पोहोचेल. अहमदाबादचे सरकार वल्लभभाई पटेल एअरपोर्टवर व्हॅक्सीनची डिलीव्हरी होईल.
केंद्र सरकारने सोमवारी सीरम इंस्टीट्यू आणि भारत बायोटेकला कोरोना व्हॅक्सीनचे सहा कोटींपेक्षा जास्त डोसची ऑर्डर दिली. सरकार सर्वात प्रथम देशातील तीन कोटी फ्रंटलाइन हेल्थ वर्कर्सला कोरोनाची लस देणार आहे. ज्याची सुरुवात 16 जानेवारीपासून होईल.