पुणे-छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीच्या वक्तव्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांकडून २८ जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली.पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी ही माहिती दिली. पवार यांचे खासगी निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीसमोर त्यांच्या विरोधात निषेधाचे फलक हाती घेत कापडी पुतळा सोमवारी (दि. २) जाळण्यात आला. या आंदोलकांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. या प्रकरणी भाजप कार्यालयाजवळून मोर्चा निघणार होता. त्यामुळे पोलिसांनी तिकडे बंदोबस्त लावला असताना अचानक बाहेरून आलेल्यांनी सहयोग सोसायटीसमोर जमत आंदोलन केले. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी कर्मचाऱ्यांसह तेथे जाऊन आंदोलकांना ताब्यात घेत त्यांच्याकडील फलक व झेंडे जप्त केले.