बीड- जिल्ह्यात संचारबंदी दरम्यान परळी तालुक्यातील सिरसाळा येथील पवार गल्लीत काही नागरिक रस्त्यावर उभे होते. यावेळी पोलीस तिथे पोहचले. यावेळी पोलीस व नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर पोलीस अन नागरिकांमध्ये हाणामारी सुरू झाली नागरिकांनी पोलिसांवर हल्ला चढविला. पोलीस आणि नागरिक यांच्यात तब्बल दहा मिनिटे फ्री स्टाईल हाणामारी झाली.
शिरसाळा येथे संचारबंदी सुरू असताना लोक घरा बाहेर वावरत होते. पोलिसांनी त्यांना मज्जाव केला त्यात पोलीस अन नागरिकांमध्ये हाणामारी सुरू झाली. यात पोलिसांसह पवार गल्ली येथील अनेक महिला पुरुष जखमी झाले आहेत. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 11 जणांविरुद्ध शिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या शिरसाळा परिसरात तणावपूर्ण स्थिती आहे. पुढील वीस दिवस बीड जिल्ह्यात लॉक डाऊन आहे. यादरम्यान नागरिकांनी व पोलिसांनी संयम ठेवून एक दुसऱ्याला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. मात्र तसे होताना दिसत नाही