पुणे :
जनमानसाच्या मनात काय आहे त्यावर निवडणूकीचा निर्णय अवलंबून असतो . आजच्या विचारमंथन आणि कार्यशाळेच्या निमित्ताने आपण आपली कामे कोणती आहेत ती समजून घेतली पाहिजेत . प्रत्येक विभागा प्रमाणे जबाबदारी दिली जाईल, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहर कार्यकारीणीसाठी आयोजित विचारमंथन आणि कार्यशाळेत दिला .
ते पुढे म्हणाले , प्रभाग रचना झाल्या आहेत , उमेदवारी देताना सर्वांना विश्वासात घेऊन , विचार विनीमय करून निर्णय घेतले जातील. गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून बरीच कामे पूर्णत्वाला गेली आहेत . ती नागरीकांसमोर मांडली पाहिजेत . सोशल मिडिया चा वापर प्रभावीपणे केला गेला पाहिजे. सर्व जाती धर्माच्या लोकांना, युवक , युवतींना सामावून घेऊन काम करायचे आहे .
लक्ष्य २०१७ गाठत असताना पुणे शहर राष्ट्रवादी कार्यकरणी, पक्षाचे काम एकत्र येऊन करताना दिसली पाहिजे. निवडणूक अधिक महत्वाची आहे ह्याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहर कार्यकारीणी , विधानसभा अध्यक्ष , सेल अध्यक्ष यांच्यासाठी विचारमंथन आणि कार्यशाळेचे कर्वेनगर , दुधाणे लॉन्स येथे आज शनिवार दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी आयोजन करण्यात आले होते .
यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार , खासदार शहराध्यक्ष वंदना चव्हाण, दिलीप बराटे , लक्ष्मीताई दुधाणे , माणिकशेठ दुधाणे, शहर कार्यकारीणी , विधानसभा अध्यक्ष , सेल अध्यक्ष उपस्थित होते.


