पुणे- आंबील ओढ्याला कलव्हर्त बांधण्याचे स्थायी समितीने मंजूर केले टेंडर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे रद्द करण्याची नामुष्की आल्यावरही महापालिकेचा कारभार सुधारला नसून आता कात्रज पासून आंबील ओढा कॉलनी पर्यंत ओढ्याला सीमा भिंत बांधण्याचे टेंडर अर्थात यासाठी काढलेले ३ टेंडर देखील वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत . शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांनी या एकूण २० कोटीच्या ३ टेंडरमध्ये गफला करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला असून अवघ्या ९ इंचाची भिंत बांधून पुरापासून रक्षण होणार आहे काय ? असा सवाल उपस्थित केला आहे . पहा याबाबत नेमके ओसवाल यांनी काय म्हटले आहे ते ऐका त्यांच्याच शब्दात..
पुन्हा टेंडर घोटाळ्याच्या भोवऱ्यात महापालिका
Date:

