पुणे : कोथरुड विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आज भाजपचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
आमदार चंद्रकांत पाटील यांची आजच भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झाली असून यानिमित्ताने चंद्रकांत पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन खासदार संजय काकडे यांनी अभिनंदन केले आणि पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर, पीएमपीएमएलचे संचालक शंकर पवार, नगरसेवक राहुल भंडारे, दिनेश धाडवे, नगरसेविका रुपाली धाडवे, नगरसेवक दिलीप वेडे पाटील, नगरसेवक किरण दगडे, नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका वासंती जाधव, नगरसेविका श्रद्धा प्रभुणे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अत्याधुनिक सेवा व सुविधांयुक्त असे हे आमदार चंद्रकांत पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. कोथरुड विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या सेवेसाठी हे कार्यालय आता सदैव तयार असेल