पुणे ता १९:’राज्य सरकार ने रिक्षा चालकांना जाहीर केलेले १८०कोटी रुपयांचे अनुदान गेले कुठे,दडवले कोणी ? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देऊनही हे अनुदान वाटप झाले नसल्याने उद्या आर टी ओ मध्ये मूक निदर्शने करण्याचा निर्णय खासदार गिरीश बापट यांनी घेतला आहे .आज खा. बापट यांनी ३०० रिक्षाचालकांना प्रत्येकी १५०० रुपयांप्रमाणे अर्थसहाय्य विविध राजकीय पक्षांच्या रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केले.
यावेळी ते म्हणाले ,’ करोना काळात ताळेबंदी मुळे समाजातील विविध घटक अडचणीत आले आहेत रिक्षा चालक ,विडी कामगार ,घरेलू कामगार व्यापारी इत्यादींना उदरनिर्वाह करणे मुश्किल झाले आहे ह्या घटकांचा विचार करून पुण्याचे खासदार म्हणून आपण पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून त्यांच्या मानधनातून रिक्षा चालकांना सहाय्य करत आहोत. या वेळी जवळपास १९ रिक्षा संघटनांचा समावेश आहे या वेळी बोलताना खा. गिरीश बापट म्हणाले ‘राज्य सरकार ने रिक्षा चालकांना सुमारे १८०कोटी अनुदान जाहीर केले परंतु अद्याप त्याचे वाटप झालेले नाही पालक मंत्र्यांच्या बैठकीत वारंवार ह्या बाबत विचारणा केल्या नंतर पालक मंत्री यांनी वाहतूक आयुक्त यांना संपर्क केला खरे तर करोना,ताळेबंदी मुळे आधीच सामान्य माणूस पिचला आहे,यात राज्य सरकार ने नुसतेच रिक्षा चालकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत जर या सरकार चे लक्ष वेधण्यासाठी उद्या दिनांक २०एप्रिल रोजी आर टी ओ येथे सकाळी १०.३० वाजता करोना नियमाचे पालन करत धरणे धरणार आहोत ‘या वेळी माजी नगरसेवक उज्वल केसकर ,नगरसेवक उमेश गायकवाड,भा ज युवा मोर्चा चे शहराध्यक्ष बापू मानकर,प्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापुरकर आदी उपस्थित होते या वेळी खालील रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींना मदत देण्यात आली१) पुणे शहर ऑटोरिक्षा फेडरेशन, २) महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, ३) विद्यार्थी वाहतूक संघटना, ४) सावकाश रिक्षा संघ, ५) मनाली ऑटो रिक्षा संघटना, ६) महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ७) राष्ट्रवादी रिक्षा संघटना, ८) पुणे शहर जिल्हा वाहतूक सेवा संघटना, ९) क्रांतिवीर रिक्षा संघटना, १०) सत्यसेवा वाहतूक संघ पुणे, ११) आम आदमी रिक्षा चालक संघटना, १२) एआयएमआयएम पुणे रिक्षा संघटना, १३) भाजपा वाहतूक आघाडी, १४) पीएस अमर ऑटो रिक्षा संघटना, १५) फडके हौद रिक्षा संघटना, १६) रिक्षा परिषद, १७) भारतीय दलित कोब्रा रिक्षा संघटना, १८) रिक्षा ब्रिगेड १९) महाराष्ट्र रिक्षा सेना,
रिक्षा चालकांच्या अनुदानासाठी खासदार बापट आक्रमक….(व्हिडिओ)
Date:

