पुणे: ‘रक्तदान करा आणि पुलवामा येथील हुतात्म्यांना अभिवादन करा’, या घोष वाक्यानुसार एमआयटी एनसीसी ट्रुपतर्फे आयोजित केलेल्या ‘सहारा ब्लड डोनेशन ड्राइव्ह’ या रक्तदान शिबिरात ३१२ रक्तदात्यांनी रक्तदान करून हुतात्म्यांना अभिवादन केले.
कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित केेलेल्या या शिबिराचे उद्घाटन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांनी केले. यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड व माईर्स एमआयटीचे कुलसचिव श्री. सु.वा.उर्फ नाना कुलकर्णी हे उपस्थित होते.
या शिबिरात दीनानाथ मंगेशकर, आचार्य अनंत ऋषी व सह्याद्री ब्लड बँकचे डॉक्टर्स व कर्मचार्यांनी विशेष मदत करून ३१२ युनिट ब्लड जमा केले. या रक्तदान शिबिरात विद्यार्थी, विद्यार्थींनी, शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी रक्तदान केले.
यावेळी शिबिराचे आयोजन करणारे स्न्वड्रन लीडर प्रा. डॉ. संजय देशमुख, कॅडेड ओंकार येनपुरे, व्हॉलेंटियर रजत सुरी, एनसीसीचे कॅडेडस व व्हॉलेंटियर्स ेउपस्थित होते.