पद्मभूषण डॉ. प्रफुल्ला देसाई यांच्या हस्ते डेक्कन
क्लिनिकच्या पुण्यातील कामकाजाची अधिकृत घोषणा
पुणे- आपआपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत असलेल्या सात डॉक्टरांनी डेक्कन क्लिनिकची एक आगळीवेगळी आणि अतिशय उपयुक्त अशी संकल्पना मांडली. डॉ. संजय देशमुख, डॉ. अनुपमा माने, डॉ. विश्वनाथ जिगजीन्नी, डॉ. सुजाइ हेगडे, डॉ. अमित मुळे, डॉ. शैलेश नाईक आणि डॉ. प्रसाद रहाते यांनी पुण्यात डेक्कन क्लीकीन सुरु केले आहे. पुना क्लब येथे आयोजित केलेल्या ह्या समारंभात डेक्कन क्लिनिकच्या स्थापनेमागील संकल्पना, उद्दिष्ट आणि ध्येय उपस्थित पाहुण्यांना आणि शुभचिंतक यांना सांगण्यात आले.
टाटा मेमोरियल सेंटर मुंबईचे माजी संचालक, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या राकोचे माजी चेअरमन, रुरल कँसर सेंटरचे संस्थापक, आणि सध्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये सिनियर ओन्कॉलॉजीस्ट म्हणूनकार्यरत असलेल्या पद्मभूषण डॉ. प्रफुल्ला देसाई यांच्या हस्ते आज डेक्कन क्लिनिकच्या पुण्यातील कामकाजाची अधिकृत घोषणा करण्यात आली.वाढत चाललेले शस्त्रक्रियांचे दर, प्रामाणिक सल्लांचा आणि योग्य शस्त्रक्रियांचा अभाव ही काही मुख्य करणे आहेत ज्याने या डॉक्टरांना एकत्र येण्यास भाग पाडले. डेक्कन क्लिनिक म्हणजे योग्य सल्ला, योग्य खर्चाचे, तुमच्या सगळ्या वैद्यकीय गरजेचे एक उत्तम ठिकाण.
“आमच्यासाठी पेशंट हा प्रथम पेशंट नसून तो एक माणूस आहे आणि त्याप्रकारेच आम्ही त्याला वागणूक देतो असे विधान समारंभात बोलताना डॉ. हेगडे यांनी केले. आम्ही नैतिक पद्धतींवर विश्वास ठेवत असून डोक्यानेविचार करण्यापेक्षा हृदयाने निर्णय घेण्यास प्राधान्य देतो ज्याचा फायदा आमच्या पेशंटला नक्कीच होतो” असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. डेक्कन क्लिनिक येथे सर्वप्रकारच्या कँसर शस्त्रक्रिया, प्लास्टिक, कॉसमेटीक् सर्जरी, ब्रेस्ट सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि सर्व शस्त्रक्रिया अत्याधुनिक टेक्नोलॉजीच्या सहाय्याने केल्या जातात. अनेक सुविधा ह्या भारतात प्रथम वापरल्या जात आहेत.
सोमवार-शनिवार, सकाळी १० ते रात्री ८ वाजता, ६०-६२, कनॉट पॅलेस, ग्राउंड फ्लोअर, बंड गार्डन रोड पुणे ४११ ००१ येथे डेक्कन क्लिनिकची सेवा उपलब्ध. अपॉइंटमेंटकरिता ०२०-२६१६ ०२६६ वर संपर्क साधा.