- काम थांबविण्याचे दिले आदेश, छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्पेश यादव यांच्या तक्रारीवर कार्रवाई
- प्रकल्पाचे बांधकाम नकाशे, भोगटवा प्रमाणपत्र, गार्डन एनओसी, फायर एनओसी रद्द करण्याचे मनपाला निर्देश
पुणे :
लोहगांव येथील सिम्बायोसिस लाॅ स्कूलच्या पाठीमागे सर्वे नंबर 24/1/1 आणि 214/1/4 येथे सुरु असलेल्या वेंकटेश लॅन्डमार्क बांधकाम प्रकल्पाला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणीय मंजुरीचे उल्लंघन केल्याप्रकरणी काम थाबविण्याचा आदेश देत चांगलाच दणका दिला आहे. प्रकल्पाला पर्यावरण मंजुरी देताना निर्धारित करण्यात आलेल्या अटीं व शर्तींनुसार काम न केल्याने एमपीसीबीने कार्रवाईचा बडगा उगारला आहे. पर्यावरणीय मंजुरीनुसार ग्रीन बेल्ट विकसित न करणे, जास्तीच्या क्षेत्रावर बांधकाम करणे, सुधारित प्लॅनच्या मंजुरीनंतर पर्यावरणीय मंजुरी न घेतल्याप्रकरणी वेंकटेश लॅन्डमार्कला काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर मंडळाने पुणे महापालिकेला संबंधित प्रकल्पाला दिलेले बांधकाम नकाशे, भोगवटा प्रमाणपत्र, गार्डन एनओसी, फायर एनओसी रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.
लोहगाव येथील सर्वे नंबर 24/1/1 आणि 214/1/4 येथे सुरु असलेल्या वेंकटेश लॅन्डमार्क बांधकाम प्रकल्पाकडून पर्यावरणीय मंजुरीचे उल्लंघन केल्याची तक्रार छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे केली होती। या प्रकल्पाला 30 अगस्ट 2020 रोजी बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार प्रकल्पास सरकारच्या पर्यावरण, वने व वातावरणीय बदल विभागाकडून 30 एप्रिल 2021 रोजी पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली आहे. सदर पर्यावरणीय मंजुरीनुसार प्रकल्पाच्या ठिकाणी 1561.8 चौ. मी क्षेत्रावर ग्रीन बेल्ट विकसित करणे अनिवार्य होते। दरम्यान, त्यानंतर संबंधित विकसकाद्वारे प्रकल्पांच्या प्लॅनमध्ये अनेकदा बदल करण्यात आला। या सुधारित प्लॅनला पर्यावरणीय मंजुरी घेणे आवश्यक होते। दरम्यान, पर्यावरणीय मंजुरी न घेता कायद्याचे उल्लंघन केल्याची तक्रार यादव यांनी केली होती।
त्यानुसार महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी प्रकल्पाच्या साईटवर जात निरीक्षण केले। यावेळी प्रकल्पाच्या ठिकाणी लेबर कॅम्पच्या ठिकाणी तात्पुरते सीवेज आणि सोलिड वेस्टचा नसल्याचे दिसून आले। त्याचबरोबर पर्यावरणीय मंजुरी घेताना दाखविण्यात आलेला ग्रीन बेल्ट विकसित केला नसल्याचे दिसून आले। भुजल प्रशासनाकडून एनओसी न घेणे, मंजुर जागेपेक्षा जास्त जागेवर बांधकाम करणे, सुधारित प्लॅननुसार सुधारीत पर्यावरणीय मंजुरी न घेणे, नैसर्गिक नाल्यांवर बांधकाम करणे, मंजुर प्लॅननुसार व पर्यावरणीय मंजुरीनुसार निर्धारित केलेल्या उंचीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले. पर्यावऱणीय मंजुरीचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्यानंतर वेंकटेश लॅन्डमार्कला सुरु असलेले आणि पुढील काम थांबविण्याचे आदेश प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत।
याप्रकरणी मंडळाने महापालिकेच्या बांधकाम विभागाला 19 डिसेंबर 2024 रोजी संबंधित प्रकल्पाला दिलेली बांधकाम परवानगी, बांधकाम नकाशे, गार्डन एनओसी, फायर एनओसी, पार्शियल भोगवटा प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, तब्बल 20 दिवसानंतरही महापालिका प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत महापालिका बांधकाम विभागाच्या झोन क्रमांक 4 चे कार्यकारी अभियंता राजेश भुतकर यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत माहिती घेऊन सांगू, असे उत्तर दिले.
नियमबाह्य काम करणार्या वेंकटेश लॅन्डमार्क बांधकाम प्रकल्पावर कार्रवाई करण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे। एमपीसीबीने बांधकाम प्रकल्पास क्लोजरचे आदेश देतेवेळी प्रस्तावित निर्देशाप्रमाणे पर्यावरणीय मंजुरी रद्द करणे, कंनसेंट रद्द करणे, वीज पाणीपुरवठा बंद करणे, बॅंक गॅरंटी जमा करणे आदी पुढील कारवाई करण्यास जाणीपूर्वक दिरंगाई केली जात आहे। कारवाई करण्यास दिरंगाई करणार्या अधिकार्यांवर एमआरटीपी अॅक्ट नुसार कार्रवाई जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसू देणार नाही। जर प्रशासनाने संबंधित प्रकल्पावर कार्रवाई न केल्यास येत्या दोन दिवसांत झोन क्रमांक 4 च्या कार्यालयाचे व प्रदुषण नियंत्रण मंडळाचे कारनामे उघडकीस आणणार आहे.
- कल्पेश यादव, अध्यक्ष, छावा प्रतिष्ठान