कौशिकी चक्रवर्ती यांच्या स्वरांचे अद्भुत गारूड,पूरिया कल्याणचे सूर ठरले अविस्मरणीय

Date:

पुणे, दि. १७ डिसेंबर २०२३ : सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सांगतेची सायंकाळ लोकप्रिय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या अद्भुत स्वराविष्काराने अविस्मरणीय ठरली. ‘सवाई’च्या विस्तीर्ण मंडपात कणभरही जागा राहू नये, अशी रसिकांची विक्रमी गर्दी रविवारी झाली होती. कौशिकी यांनीही आपल्या स्वरांच्या जादूने रसिकांना भारावून टाकले.

सायंकाळी सहाच्या सुमारास कौशिकी यांचे स्वरमंचावर आगमन होताच, रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. त्यांच्या आगमनाने रसिकांमध्ये उसळलेली चैतन्य आणि उत्साहाची लहर अवर्णनीय होती. रसिकांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांपासून, तरूणाई, प्रौढ आणि बुजुर्गांपर्यंत सर्व प्रकारच्या श्रोत्यांचा समावेश होता.

कौशिकी यांनी समयोचित अशा ‘पूरिया कल्याण ‘ रागात ‘होवन लगी सांज’ हा पारंपरिक ख्याल झुमरा तालात सादर केला. पाठोपाठ तीन तालात ‘सुनलीनो मोरी शाम’ ही द्रुत बंदिश सादर केली.‌तिन्ही सप्तकांत लीलया फिरणारा अतिशय मधुर आवाज, प्रसन्न मुद्रेने स्वतः आनंद घेत केलेले सादरीकरण, साथीदारांना वेळोवेळी दिलेली दाद आणि हे सारे सांभाळून रागभाव आणि बंदिशीमधून व्यक्त होणारा मूड नेमकेपणाने कायम ठेवण्याचे कौशल्य… यामुळे त्यांच्या गायनाने अल्पवयीन रसिकांच्या मनाची पकड घेतली. द्रुत लयीतील गायनात सरगमचे विविध पॅटर्न, वैविध्यपूर्ण लयकारी यामुळे त्यांनी वेगळा आनंद दिला.

आदीदेव महादेव, ही यमन रागातील शिवस्वरूपाचे वर्णन करणारी रचना, पहाडी ठुमरी सादर करताना कौशिकी यांचे भावदर्शन उल्लेखनीय होते. ‘रंगी सारी गुलाबी चुनरिया रे’ या रचनेत कौशिकी यांनी अत्यंत नजाकतदार स्वराकृतींनी मांडणी केली. लगेच अतिशय वेगळ्या भावावस्थेचे वर्णन करणारी ‘हरी ओम् तत्सद्’ ही रचना सादर करून कौशिकी यांनी आपल्या गायनाची सांगता केली.

त्यांना ओजस अढिया (तबला), तन्मय देवचके (हार्मोनियम), उस्ताद मुराद खान (सारंगी) यांनी रंगतीत भर घालणारी साथ केली. अनुजा क्षीरसागर आणि आलापिनी निसळ यांनी तानपुरा साथ केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...