पुणे -एमपीएससीच्या २०२५ मधील काहीमहत्त्वाच्या परीक्षा अजून बाकीआहेत. असे असतानाच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिलासा देणारी बाब आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने२०२६ मधील विविध परीक्षांचेसंभाव्य वेळापत्रक जाहीर केलेआहे. यामुळे उमेदवारांनापरीक्षेनुसार नियोजन करण्यासाठी आता दिलासा मिळाला आहे.
राज्यभरातून विविध शाखांचेविद्यार्थी मोठ्या प्रमाणात स्पर्धापरीक्षेतून करिअरची संधी मिळवूइच्छितात. प्रशासकीय सेवेत जातायावे, यासाठी महाराष्ट्र लोकसेवाआयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्याविविध परीक्षा देतात. उमेदवारांनापरीक्षेची तयारी चांगल्या पद्धतीनेकरता यावी, यासाठी नियोजनदेखील चांगले असावे. या हेतूनेआयोगाने २०२६ मध्ये होणाऱ्यागट क, गट ब यासह कृषी,अभियांत्रिकी आणि मुख्य परीक्षा,संयुक्त परीक्षांचे वेळापत्रकजाहीर केले आहे. यावेळापत्रकानुसार राज्यसेवा मुख्यपरीक्षा २०२५ ही २९ मार्च २०२६ला घेण्यात येणार आहे. वनसेवामुख्य परीक्षा गट अ ही ५ मे २०२६मध्ये घेण्यात येणार आहे. गेल्याकाही वर्षांत परीक्षांचे वेळापत्रकजाहीर झाल्यानंतरही अडचणीआल्याने वेळापत्रकात बदलकेला होता. तसेचअतिवृष्टीमुळेही ऑक्टोबरमध्येहोणाऱ्या परीक्षेची तारीखबदलण्यात आली. आता मात्रविद्यार्थ्यांना नियोजन करण्यासाठी२०२६ चे संभाव्य वेळापत्रकआयोगाने जाहीर केल्याचेसूचनापत्रात म्हटले आहे.
या वेळी उमेदवारांना नियोजनासाठी मिळणार पुरेसा वेळ
दरवर्षी नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये पुढील वेळापत्रक जाहीर होते, परंतु यंदा ऑक्टोबर२०२६ मध्ये होणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक आयोगाने जाहीर केले. यामुळे उमेदवारांनापुरेसा वेळ पुढील परीक्षांच्या तयारीसाठी मिळेल. त्याचे नियोजनही करता येईल.
- अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन.
असे आहे विविध परीक्षांचे जाहीर संभाव्य वेळापत्रक
राज्यसेवा मुख्यपरीक्षा २०२५ : २९ मार्च२०२६, निकाल ऑगस्ट२०२६ ५ एप्रिल पेपर ३, १८एप्रिल सामान्य अध्ययन १,२०२६ १९ एप्रिल २०२६,सामान्य अध्ययन ३, २६एप्रिल वैकल्पिक पेपर,निकाल ऑगस्टमध्ये
महाराष्ट्र वनसेवामुख्य परीक्षा २०२५ : ५ ते७ मे २०२६
स्थापत्य अभियांत्रिकीसेवा मुख्य परीक्षा २०२५: ७ ते ९ मे २०२६
कृषी सेवा मुख्य २०२५: १६ मे २०२६
गट ब सेवा संयुक्तमुख्य परीक्षा २०२५ : १७मे २०२६, निकालसप्टेंबरमध्ये
गट क सेवा संयुक्तपूर्व परीक्षा : ४ जानेवारी२०२६
अन्न व औषधप्रशासकीय सेवा मुख्यपरीक्षा : २१ नोव्हेंबर २०२६
वनसेवा मुख्य परीक्षा२०२६ : २६ डिसेंबर २०२६
गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा : १४ जून, निकालऑक्टोबरमध्ये
गट क संयुक्त पूर्वपरीक्षा : १२ जुलै,नोव्हेंबरमध्ये निकाल
गट क मधील संयुक्तसेवा मुख्य परीक्षा : १३डिसेंबर, निकाल एप्रिल२०२७.

