टाटा समूहाच्या वित्तीय सेवाक्षेत्रातील अग्रगण्य एनबीएफसी कंपनी टाटा कॅपिटल ने आपल्या सामाजिक उपक्रमांची गती कायम ठेवली असून, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशभरातील १ दशलक्षहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोच साधली आहे. कंपनीने पाणी संवर्धन, क्लीन एनर्जी, आरोग्य आणि शिक्षण या महत्त्वाच्या क्षेत्रांत केंद्रित उपक्रम राबवून समाजात सकारात्मक योगदान दिले आहे.
कंपनीच्या वार्षिक अहवालात नमूद केल्याप्रमाणे, “भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जबाबदार वित्तीय भागीदार” ही भूमिका बजावताना टाटा कॅपिटलने सामाजिक आणि पर्यावरणीय प्राधान्यक्रम आपल्या मुख्य व्यवसाय धोरणाचा भाग बनवले आहेत.
पाणी संवर्धनासाठी “जलआधार”
टाटा कॅपिटलच्या जलआधार उपक्रमांतर्गत, महाराष्ट्र, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांतील २००+ गावांमध्ये पाणलोट क्षेत्रांचा विकास करण्यात आला. या उपक्रमातून २,५०० दशलक्ष लिटरपेक्षा अधिक पाणी साठवण क्षमता निर्माण झाली, ७९० पेक्षा अधिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन झाले आणि ५.४ लाखांहून अधिक नागरिकांना फायदा झाला. सरासरी ५.५ मीटरने भूजलपातळी वाढली असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अंदाजे ₹३०,००० ने वाढ झाली.
क्लीन एनर्जी साठी “ग्रीन स्विच”
या उपक्रमांतर्गत ‘क्लीन एनर्जी’ विकासाच्या माध्यमातून १९ लोकवस्त्यांमध्ये सौरऊर्जा डिसेंट्रलाइज्ड, कम्युनिटी-ओन्ड सिस्टीमच्या माध्यमातून २४x७ पॉवर पोहोचवली गेली, ज्यामुळे ७,४०० हून अधिक नागरिक आणि १,२०० घरे विजेने उजळली. या उपक्रमाचा एकत्रित परिणाम म्हणून आजपर्यंत महाराष्ट्र, झारखंड आणि उत्तर प्रदेशातील ९९ लोकवस्त्यांना वीज मिळाली असून २०,७०० हून अधिक नागरिकांना थेट फायदा झाला आहे. यामुळे स्थानिक उद्योजकांच्या वार्षिक उत्पन्नात सरासरी ₹४०,००० इतकी वाढ झाली आहे.
आरोग्यासाठी “आरोग्यतारा”
उपचारक्षम अंधत्व नष्ट करण्याच्या दिशेने ६.१६ लाख व्यक्तींची तपासणी करण्यात आली, तर ४४,००० हून अधिक दृष्टी परत आणणाऱ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या उपक्रमाद्वारे आजवर १० लाखांपेक्षा अधिक नागरिकांपर्यंत पोहोच साधली गेली आहे.
शिक्षणासाठी “पंख” शिष्यवृत्ती
तरुणांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १२,००० हून अधिक विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली.
या उपक्रमांद्वारे टाटा कॅपिटलने केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक प्रगतीलाही हातभार लावण्याची आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे.

