राष्ट्रीय शालेय क्रीडास्‍पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद क्रीडा आयुक्‍त शीतल तेली-उगले यांच्‍याकडे करंडक सुपूर्त

Date:

पुणे : खेलो इंडिया युवा स्पर्धा पाठोपाठ राष्ट्रीय शालेय क्रीडा स्‍पर्धेतही सर्वसाधारण विजेतेपदकाचा करंडक महाराष्ट्राने पटकविला आहे. विजेतेपदकाचा करंडक क्रीडा व युवक कल्‍याण विभागाच्‍या आयुक्‍त शीतल तेली-उगले यांच्‍याकडे सुपूर्त करण्यात आला आहे.

गतविजेत्या महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी करीत ६८ व्‍या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्‍पर्धेतही महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपदाचा पराक्रम केला आहे. १९७ सुवर्ण, १५९ रौप्य, १७४ कांस्य अशी एकूण ५३० पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राने अव्वल स्थानाचे शिखर सर केले आहे. पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात विजेतेपदकाचा करंडक क्रीडा व युवक सेवा संचलनालय आयुक्‍त शीतल तेली-उगले यांच्‍याकडे सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जोशी यांनी सूपूर्त केला आहे. यावेळी उपसंचालक संजय सबनीस, क्रीडा अधिकारी अरुण पाटील उपस्‍थित होते.

महाराष्ट्राच्‍या खेळाडूंचे अभिनंदन करून आयुक्‍त शीतल तेली-उगले म्‍हणाल्‍या की, वरिष्ठ, युवा गटाप्रमाणेच शालेय स्‍पर्धेतही महाराष्ट अव्‍वल आहे. या यशाचे खेळाडूंसह त्‍यांचे प्रशिक्षक, पालक, संघटक या सर्वांनीच कौतुकास्‍पद कामगिरी केली आहे. ही परंपरा कायम राखण्यासाठी खेळाडूंच्‍या पाठी शासन खंबीरपणे उभे असेल.

दिल्‍ली,हरियाणा या बलाढ्य संघांना मागे टाकून महाराष्टाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घातली आहे. दिल्‍लीने १२४ सुवर्ण, ९४ रौप्य, ११८ कांस्य पदकांसह एकूण ३३६ पदके जिंकून दुसरे स्थान प्राप्त केले. हरियाणा संघ ११४ सुवर्ण, ८० रौप्य, १०३ कांस्य एकूण २९७ पदकांसह तिसर्‍या स्थानावर राहिला. स्‍पर्धेत महाराष्ट्राचे २५२८ क्रीडापटू सहभागी झाले होते. ४२ खेळातील १५५ क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्‍या खेळाडूंच्‍या यशाचा डंका देशभरात वाजला आहे.

दिल्‍लीत संपन्‍न झालेल्‍या भारतीय शालेय स्‍पर्धा महासंघाच्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत महाराष्ट्राला विजेतेपदाच्‍या करंडकाने गौरविण्यात आले. भारतीय शालेय खेळ महासंघाचे अध्यक्ष दिपक कुमार यांच्‍या हस्‍ते उपसंचालक उदय जोशी व क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी राज्य्च्या वतीने विजेतेपदाचा करंडक स्‍वीकारला. याप्रसंगी देशभरातील राज्‍य प्रतिनिधी उपस्‍थित होते. महाराष्ट्राच्या पदक विजेत्या खेळाडूंचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी दृकश्राव्य प्रणालीव्दारे अभिनंदन केले आहे.

एकाच वर्षात राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धा,खेलो इंडिया युवा स्पर्धा व राष्ट्रीय शालेय क्रीडा स्‍पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्‍य ठरले आहे. शालेय गट, १८ वर्षांखालील युवा गट व वरिष्ठ गटात विजेतेपदकाचा पराक्रम सलग दुसऱ्यांदा करणाऱ्याचा मानही महाराष्ट्राने पटकविला आहे. राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धा,खेलो इंडिया युवा स्पर्धा प्रमाणेच राष्ट्रीय शालेय क्रीडा स्‍पर्धेतील पदकविजेत्‍यांना क्रीडा व युवक सेवा संचलनालकडून रोख बक्षिस देण्याची परंपरा आहे. सुवर्ण, रौप्‍य व कांस्य पदक विजेत्‍यांना अनुक्रमे रू.११२५०, रू.८९५०, रू.६७५० तसेच सहभागी खेळाडूंनाही रू. ३७५० रूपयांचे रोख शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

पुणे, दि. १ : २०८ व्या शौर्यदिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री...

राजकारणा पलीकडची जिव्हाळ्याची नाती! गणेश बिडकरांकडून स्व. शोभा बारणे ,राजपाल, थोपटे कुटुंबीयांची भेट

पुणे, दि ३१: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार, बैठका आणि...

नववर्ष महाराष्ट्रासाठी विकासाच्या नव्या संधी घेऊन येईल-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 1 :- राज्यातील नागरिकांच्या सक्रिय सहभागातून, आधुनिक...

पुणे विमानतळावर प्रवासी संख्येचा नवा विक्रम

पुणे -आंतरराष्ट्रीय विमानतळाने २०२५ मध्ये प्रवासी संख्येचा नवा उच्चांक...