पुणे – महापालिकेकडून समान पाणी योजनेअंतर्गत पाण्याचे ऑडीट करण्यासाठी शहरातील मुख्य जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत ( बुधवारी, दि. 15) आणि ( गुरूवारी दि. 16) शहारातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर पाणी बंद असलेल्या भागातील पुरवठा दुसऱ्या दिवशी सकाळी आणि उशीराने होणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बुधवारी पाणी बंद असलेला भाग
सणस पंपिग स्टेशन :- नऱ्हे, धायरी मानस परिसर, धायरी खंडोबा मंदिर परिसर गल्ली नं. बी 10 ते बी-14
गुरूवारी पाणी बंद असलेला भाग
चतुश्रृंगी टाकी परिसर – बोपोडी, अनगळ पार्क, खडकी, सहारा हॉटेल, राजभवन, पंचवटी, औंध, खडकी ऍम्युनेशन फॅक्टरी, अभिमानश्री सोसायटी,
एसएनडीटी टाकी परिसरा – शिवाजीनगर, भोसलेनगर, “चोले रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यू कॉलनी, पोलीस लाईन, गोखलेनगर, भांडारकर रोड आणि परिसर
पद्मावती टाकी परिसर – बिबवेवाडी, अप्पर व सुपर इंदिरानगर, संभाजीनगर, काशिनाथ पाटील नगर, लोअर इंदिरानगर, चिंतामणीनगर, स्टेट बॅंकनगर लेक टाउन, गंगाधाम, बिबवेवाडी, कोंढवा रस्ता, विद्यासागर कॉलनी, सॅलिसबरी पार्क, महर्षीनगर, डायस प्लॉट, मार्केट यार्ड, धनकवडी, गुलाबनगर, चैतन्यनगर, तळजाई वसाहत परिसर.
नवीन कॅन्टोनमेंट जलशुद्धीकरण केंद्र – ससाणेनगर, काळेबोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, वानवडी, चंदननगर, खराडी, रामटेकडी, माळवाडी, भोसले गार्डन, 15 नंबर आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेवनगर, मगरपट्टा परिसर.