पुणे, 19 ऑक्टोबर 2021- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत सौरभ नवले(120धावा) याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत चौथ्या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.
व्हेरॉक क्रिकेट अकादमीच्या मैदानावरील लढतीत प्रथम फलंदाजी करताना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 50षटकात 6बाद 340धावाचे आव्हान उभे केले. यात सौरभ नवलेने 103चेंडूत 14चौकारांच्या व 3षट्काराच्या साहाय्याने 120 धावांची शतकी खेळी केली. सौरभ व किरण मोरे(71धावा) यांनी तिसऱ्या गड्यासाठी 151 चेंडूत 167 धावांची खेळी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मिझान सय्यद 40, टिळक जाधव 19, मनोज यादव नाबाद 15 यांनी धावा काढून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. हे आव्हान ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी संघाला पेलवले नाही व त्यांचा डाव 35.2षटकात सर्वबाद 153 धावावर कोसळला. यात अनिकेत नलावडे 45, प्रज्वल घोडके 32, प्रथमेश बाजारी 18, वैभव पाटील 12 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. व्हेरॉक संघाकडून राहुल वारे(4-23), कपिल गायकवाड(2-34), अॅलन रॉड्रिक्स(2-34), ओंकार राजपूत(1-24) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 187धावांनी विजय मिळवून दिला.
पूना क्लब मैदानावरील सामन्यात केडन्स क्रिकेट अकादमी संघाने पूना क्लब संघाचा 7 गडी राखून पराभव करत दुसरा विजय मिळवला. केडन्स क्रिकेट अकादमीच्या शुभम हरपाळे(5-26), इझान सय्यद(4-47) यांच्या आक्रमक गोलंदाजीपुढे पूना क्लब संघाचा डाव 41.1षटकात सर्वबाद 203 धावावर संपुष्ठात आला. पूना क्लब संघ 8.5षटकात 7बाद 16धावा असा अडचणीत असताना फलंदाजीस आलेल्या ओंकार आखाडेने 138चेंडूत 13चौकार व 1षट्काराच्या मदतीने 126धावांची धडाकेबाज शतकी खेळी केली. ओंकारला हर्ष ओसवालने 60चेंडूत 7चौकारांच्या मदतीने 43 धावा काढून चांगली साथ दिली. या दोघांनी आठव्या गड्यासाठी 145 चेंडूत 135धावांची भागीदारी केली. याच्या उत्तरात केडन्स क्रिकेट अकादमी संघाने हे आव्हान 45.4षटकात 3बाद 204धावा करून पूर्ण केले. यात अथर्व धर्माधिकारी नाबाद 68, ऋषिकेश मोटकर 43, अथर्व काळे नाबाद 42, दिग्विजय पाटील 25 यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. पूना क्लबकडून राजकमल चौहान(1-34), अमेय मुजुमदार(1-38), ओंकार आखाडे(1-39)यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सामनावीर शुभम हरपाळे ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 50षटकात 6बाद 340धावा(सौरभ नवले 120(103,14×4,3×6), किरण मोरे 71(98,2×4,4×6), मिझान सय्यद 40(30,3×4,1×6), टिळक जाधव 19, मनोज यादव नाबाद 15, अजित बागाडी 3-69, प्रथमेश बाजारी 1-62) वि.वि.ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी: 35.2षटकात सर्वबाद 153 धावा(अनिकेत नलावडे 45(54,4×4,1×6), प्रज्वल घोडके 32(42), प्रथमेश बाजारी 18, वैभव पाटील 12, राहुल वारे 4-23, कपिल गायकवाड 2-34, अॅलन रॉड्रिक्स 2-34, ओंकार राजपूत 1-24);सामनावीर-सौरभ नवले; व्हेरॉक संघ 187धावांनी विजयी;
पूना क्लब: 41.1षटकात सर्वबाद 203 धावा(ओंकार आखाडे 126(138,13×4,1×6), हर्ष ओसवाल 43(60,7×4), शुभम हरपाळे 5-26, इझान सय्यद 4-47, सिद्धेश वरगंटे 1-47) पराभूत वि. केडन्स क्रिकेट अकादमी: 45.4षटकात 3बाद 204धावा(अथर्व धर्माधिकारी नाबाद 68(135,3×4), ऋषिकेश मोटकर 43(46,8×4), अथर्व काळे नाबाद 42(56,3×4), दिग्विजय पाटील 25, राजकमल चौहान 1-34, अमेय मुजुमदार 1-38, ओंकार आखाडे 1-39);सामनावीर शुभम हरपाळे; केडन्स 7 गडी राखून विजयी.