पुणे : ज्येष्ठ कार्यकर्ते ,प्रमुख नागरिक ,आणि उत्साही युवक कार्यकर्ते यांच्या समवेत कसबा विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार अरविंद शिंदे यांच्या पदयात्रा कसबा पेठ आणि महात्मा फुले मंडई परिसरात बुधवारी काढण्यात आल्या .पेठांमधील पाणीप्रश्न सोडवावा अशी विनंती अनेक रहिवाशांनी शिंदे यांच्याकडे केली.
कॉंग्रेस ,राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षाच्या आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे यांच्या प्रचाराचा प्रारंभ सकाळी दारूवाला पूल येथील श्री नागेश्वर मंदिरापासून करण्यात आला.ही पदयात्रा कमला नेहरू हॉस्पिटल,कागदीपुरा, कुंभार वाडा, पवळे चौक,अजंठा मंडळ,त्वष्टा कासार मंडळ ,मोटे मंगल कार्यालय,नवग्रह मंदिर,फणी आळी तालीम,मुजुमदार बोळ, ,शिंपी आळी, ,फडके हौद, व्यवहार आळी,झांबरे चावडी, गावकोस मारुती या मार्गाने काढण्यात आली. ठिकठिकाणी रहिवाशांनी शिंदे यांचे स्वागत केले. कसब्यासह सर्व पेठांमधील पाणीप्रश्नात लक्ष घालून ,तो सोडवावा अशी विनंती नागरिकांनी शिंदे यांना केली .
या पदयात्रेत रोहित टिळक ,रवींद्र धंगेकर ,सदानंद शेट्टी, सुजाता शेट्टी,बुवा नलावडे,जयसिंग भोसले, विद्याताई भोकरे,अजित दरेकर,मुख्तार शेख,विजय खराडे,गणेश नलावडे,प्रवीण करपे,राजेंद्र खराडे,नरेश नलावडे ,मयूर भोकरे,योगेश भोकरे,शैलेश भोकरे,परवेज तांबोळी,विजय तिकोने,बबलू कोळी,गीता तारु,वनिता जगताप आदी सहभागी झाले होते.
महात्मा फुले मंडईतील श्री शारदा -गजाननाचे दर्शन घेऊन तसेच लोकमान्य टिळक आणि लोकनेते यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मंडई परिसरातील पदयात्रेला अरविंद शिंदे यांनी प्रारंभ केला .मंडईतील भाजीविक्रेते ,छोटे व्यावसायिक यांच्या भेटी घेतल्या.
या पदयात्रेत रोहित टिळक ,डॉ सतीश देसाई,रवींद्र धंगेकर,कमलताई व्यवहारे,वनराज आंदेकर अजित दरेकर,बाळासाहेब मारणे ,बाळासाहेब अमराळे,सुनील खाटपे,राजेंद्र भणगे,संजय मते,अनिल सोंडकर,प्रवीण करपे,प्रकाश पवार,सुर्यकांत मारणे ,अविनाश ताकवले,तीलेश मोता,अजय दराडे, सोनाली मारणे ,भारती कोंडे,नीता राजपूत,मनीषा नेवसे ,बटूल अपा शेख,शशिकला बोरकर आदी सहभागी होते