पुणे-पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती आली आहे. रात्री उशिरा या बदल्यांचे आदेश गृहविभागाने काढले आहेत. डॉ. के. व्यंकटेशम यांची विशेष अभियान महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे शहराचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये सूत्रे हाती घेतली होती. तेव्हा पासून आजअखेर नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवून, पोलीस आणि नागरिकांमध्ये संवाद वाढविण्याचे काम त्यांच्या या कार्यकाळात केले गेले आहे. तर आता डॉ. के. व्यंकटेशम यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीण अधीक्षक पदी अभिनव देशमुख
पुणे ग्रामीण अधीक्षक संदीप पाटील यांची गडचिरोली मध्ये बदली झाल्यावर त्यांच्या जागी कोण येणार अशी चर्चा सुरू असताना. आज कोल्हापूर पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची पुणे ग्रामीण अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
(सध्याचे पद व नव्या नियुक्तीचे ठिकाण)
विशेष पोलिस महानिरीक्षक-ब्रिजेशसिंह- बदली आदेशाधीन- विशेष पोलिस महानिरीक्षक प्रशासन मुंबई
मकरंद रानडे- बदली आदेशाधीन- गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
मोहितकुमार गर्ग- अतिरिक्त पोलिस अधीक्षक गडचिरोली- पोलिस अधीक्षक रत्नागिरी
विक्रम देशमाने- पोलिस उपायुक्त एटीएस- ठाणे ग्रामीण
राजेंद्र दाभाडे- पोलिस उपायुक्त गुन्हे विभाग मुंबई- पोलिस अधीक्षक सिंधुदर्ग
सचिन पाटील- समादेशक, एसआरपी, गट 11- पोलिस अधीक्षक नाशिक
मनोज पाटील- पोलिस अधीक्षक सोलापूर- पोलिस अधीक्षक नगर
अभिनव देशमुख- पोलिस अधीक्षक कोल्हापूर- पोलिस अधीक्षक पुणे
दीक्षितकुमार गेडाम- पोलिस अधीक्षक सिंधुदर्ग- पोलिस अधीक्षक सांगली
शैलेश बलकवडे- पोलिस अधीक्षक गडचिरोली- पोलिस अधीक्षक कोल्हापूर
विनायक देशमुख- सहायक पोलिस महानिरीक्षक, मुंबई- पोलिस अधीक्षक जालना
राजा रामास्वामी- पोलिस उपायुक्त, गुप्तवार्ता- पोलिस अधीक्षक बीड
प्रमोद शेवाळे- पोलिस उपायुक्त ठाणे- पोलिस अधीक्षक नांदेड
निखील पिंगळे- समादेशक एसआरपी, नागपूर- पोलिस अधीक्षक लातूर
अंकित गोयल- पोलिस उपायुक्त, परिमंडळ 10 मुंबई- पोलिस अधीक्षक गडचिरोली
डी. के. पाटील- पोलिस अधीक्षक बुलढाणा- पोलिस अधीक्षक यवतमाळ
अरविंद चावरिया-एसीबी, औरंगाबाद- पोलिस अधीक्षक बुलढाणा
विश्वा पानसरे – पोलिस अधीक्षक रेल्वे नागपूर- पोलिस अधीक्षक गोंदिया
अरविंद साळवे- पोलिस अधीक्षक भंडारा- पोलिस अधीक्षक चंद्रपूर
वसंत जाधव- पोलिस उपायुक्त शीघ्र कृती गल, मुंबई- पोलिस अधीक्षक भंडारा
राकेश कलासागर- सीआयडी- पोलिस अधीक्षक हिंगोली
जयंत मीना- बदली आदेशाधीन- पोलिस अधीक्षक परभणी