पुणे- राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेवक श्रीकांत जगताप यांनी आज येथे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले . यावेळी ५०० वृक्ष लावण्याच्या उपक्रमास प्रारंभ ,रक्तदान शिबीर ,गरजूंना शिधा वाटप आणि कोरोनाने स्वर्गवासी झालेल्या दाम्पत्यांची अनाथ झालेल्या ५ मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणे यांचा समावेश होता . नगरसेवक जगताप तसेच विनायक तांबे,संतोष चौरे,सुनिल शिंगाडे,रमेश उकिरडे,संदीप माने,रमेश गोरे,महेश वाघमारे,संकेत इंनकर आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.