पुणे, 24 मे 2022: फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 16वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात ओमकार शिंदे याने तर, मुलींच्या गटात वैष्णवी सिंग, अभिलिप्सा मल्लिक, श्रावणी देशमुख या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात वैष्णवी सिंग हिने अव्वल मानांकित श्रीया साईचा 6-1, 6-4 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. बिगरमानांकीत अभिलिप्सा मल्लिक हिने कडवी झुंज देत पाचव्या मानांकित प्रतिष्ठा सानीचा 6-4, 0-6, 6-3 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. श्रावणी देशमुख हिने सातव्या मानांकित रिद्धी शिंदेचा 6-1, 6-2 असा सहज पराभव केला. लकी लुझर ठरलेल्या श्रीमोई कामतने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या ध्रुवा मानेचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
मुलांच्या गटात ओमकार शिंदेने आठव्या मानांकित अर्चित धूतचे आव्हान 6-3, 6-4असे संपुष्ठात आणले. चुरशीच्या लढतीत अवनीश चाफळे याने अद्विक नाटेकरवर 7-5, 4-6, 6-3 असा तीन सेटमध्ये विजय मिळवला. अभिराम निलाखेने आशुतोष कवडेकरचा 5-7, 6-1, 6-0 असा तर, अमोघ दामलेने दिव्यांक कवितकेचा 6-2, 6-2 असा पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला.
निकाल: मुख्य ड्रॉ(दुसरी फेरी): मुले:लक्ष गुजराथी[1] वि.वि.अनुज तशीलदार 2-6, 6-1, 6-0;अवनीश चाफळे वि.वि.अद्विक नाटेकर 7-5, 4-6, 6-3; अमोघ दामले वि.वि.दिव्यांक कवितके 6-2, 6-2;अभिराम निलाखे वि.वि.आशुतोष कवडेकर 5-7, 6-1, 6-0;ओमकार शिंदे वि.वि.अर्चित धूत[8] 6-3, 6-4; पियुश जाधव वि.वि.अर्जुन कीर्तने 6-4, 6-4;राघव अमीन[3] वि.वि.सिद्धांत कुलकर्णी 6-4, 6-1;
मुली:वैष्णवी सिंग वि.वि.श्रीया साई[1] 6-1, 6-4; श्रावणी देशमुख वि.वि.रिद्धी शिंदे[7] 6-1, 6-2;देवांशी प्रभुदेसाई[4] वि.वि.भक्ती ताजने 6-0, 6-3;
रिशीता पाटील वि.वि.आर्या शिंदे 3-6, 6-1, 6-3;अभिलिप्सा मल्लिक वि.वि. प्रतिष्ठा सानी [5] 6-4, 0-6, 6-3;साईइती वराडकर[3]वि.वि ह्रितिका कापले 3-6, 1-0 सामना सोडून दिला; श्रीमोई कामत वि.वि.ध्रुवा माने 6-2, 6-3;रितिका मोरे[8] वि.वि.नेहा केळकर 7-6(5), 6-1;
दुहेरी: मुले: दुसरी फेरी:लक्ष गुजराथी/स्वराज ढमढेरे[1] वि.वि.पारस घाडगे/संतोष भुजबळ 6-0, 6-1;अमोघ दामले/शिवम पाडिया वि.वि.सिद्धांत कुलकर्णी/अंकित रे 6-1, 6-2;शार्दूल खवळे/क्रिशांक जोशी वि.वि.नचिकेत गोरे/स्वर्णिम येवलेकर 6-1, 6-2;अर्णव बनसोडे/अभिराम निलाखे वि.वि.समीहन देशमुख/सूर्या काकडे 6-0, 6-1;