पुणे- वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांनी भाजपच्या जगदीश मुळीक यांचा 4,975 अशा मताधिक्याने पराभव केला आहे.भाजपच्या जगदीश मुळीक यांना 92,725 मते मिळाली तर सुनील टिंगरे यांना 97,700 मते मिळाली आहेत. तर 2,417 मते नोटाला मिळाली आहेत. भाजपच्या हवे बाबत मुळीकयांना प्रचंड आत्मविश्वास होता .बाप्पू पठारे यांना भाजपमध्ये घेतल्यावर त्यांना विजयाबाबत अजिबात शंका राहिली नव्हती . छोट्या छोट्या घटकांकडे त्यांचे दुर्लक्ष होत गेले त्याचा फायदा टिंगरे यांना झाला .
2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढविल्या होत्या. त्यावेळी टिंगरे हे शिवसेनेकडून लढले होते.
वडगावशेरी मतदारसंघ
1.सुनील टिंगरे (राष्ट्रवादी ) – 97,700 मते विजयी झालेले उमेदवार
2. जगदीश मुळीक (भाजप ) – 92,725 मते
3. बेंगळे राजेश दत्तात्रेय (बहुजन समाज पार्टी) – 1653 मते
4. गणेश बाळकृष्ण ढमाले (आम आदमी पार्टी) – 908 मते
5. डॅनियल लांडगे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) – 7702 मते
6. प्रविण बापूराव गायकवाड (वंचित बहुजन अघाडी) – 10276 मते
7. प्रसाद सुभाष कोद्रे (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी) – 174 मते कधीही आमदार रिपीट न करण्याचा विक्रम वडगावशेरी मतदार संघाने कायम ठेवला आहे. राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांनी भाजपच्या जगदीश मुळीक यांचा 4,975 अशा मताधिक्याने पराभव केला आहे.
भाजपच्या जगदीश मुळीक यांना 92,725 मते मिळाली तर सुनील टिंगरे यांना 97,700 मते मिळाली आहेत. तर 2,417 मते नोटाला मिळाली आहेत.
वीस नगरसेवक, दहा माजी नगरसेवक, एक माजी आमदार एवढ्या सगळ्या फौज फाट्यासह उभे राहिलेले सत्ताधारी पक्षाचे भाजपचे उमेदवार आमदार जगदीश मुळीक आणि त्याविरोधात उमेदवारी मिळालेले राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील टिंगरे…हे चित्र पाहता वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील हा सामना एकतर्फी होईल असे चित्र सुरुवातीपासून निर्माण केले जात होते. लोकसभेला भाजपच्या उमेदवाराला वडगाव शेरीत मिळालेले 56 हजाराचे मताधिक्य वाढवून ते 70 हजारापर्यंत नेण्याचे नियोजन भाजप महायुतीने केले होते. त्यातच उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचार सुरू झाल्यानंतर चार दिवसांनी राष्ट्रवादीसोबत असलेले माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी हातातील घड्याळ काढून हातात कमळ पकडले. या साऱ्या घडामोडित हवेत गेलेल्या नेते मंडळीना जोरका झटका बसला आहे.