पुणे हे भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या निवासी रिअल इस्टेट ठिकाणांपैकी एक
मॅजिकब्रिक्सच्या इंडियाज टॉप-10 प्रेफर्ड रेसिडेन्शिअल लोकॅलिटीज या अहवालातील निष्कर्ष
पुणे- ठिकाणांची किफायतशीरता, उपलब्धता, कनेक्टिविटी व सामाजिक पायाभूत सुविधा हे घटक 2019 मधील तिसऱ्या तिमाहीत भारतात सर्वाधिक शोधण्यात आलेल्या आघाडीच्या 10 ठिकाणच्या निवासी रिअल इस्टेटच्या मागणीला चालना देण्यासाठी कारणीभूत ठरले आहेत. भारतातील हौसिंगला असलेल्या मागणीच्या ट्रेंडविषयी मॅजिकब्रिक्सने सविस्तर अहवाल तयार केला असून त्यामध्ये भारतातील सर्वात पसंतीच्या आघाडीच्या 3 ठिकाणांमध्ये नोएडा एक्स्टेंशन, मिरा रोड (मुंबई) व वाकड (पुणे) या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.
सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवासी बाजारांमध्ये पुण्याचाही समावेश असून, खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडून सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या व पसंती दिल्या जाणाऱ्या आघाडीच्या 10 ठिकाणांच्या यादीमध्ये पुण्यातील वाकड, बाणेर व पिम्पळे सौदागर या तीन ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.
हिंजवडीमध्ये अधिकाधिक आयटी कंपन्या येत असल्याने वाकड येथे निवासी मागणी कायम राहील, असा अंदाज मॅजिकब्रिक्स संशोधनाने वर्तवला आहे.
- परिसरामध्ये सरासरी दर प्रति चौरस फूट 6,650 रुपये, गेल्या एका वर्षामध्ये 1% वाढ
- अपार्टमेंटचा सरासरी आकार 1170 चौरस फूट, आघाडीच्या 10 ठिकाणांमध्ये दुसरा सर्वात कमी
- 75% ग्राहक 1 व 2 BHK चा शोध घेतात, एकटे 2 BHK 62% ग्राहकांची पसंती मिळवत आहेत
- 75% ग्राहक अनफर्निश्ड मालमत्ता शोधत आहेत, उपलब्ध असणाऱ्या मालमत्तांमधील स्वस्त पर्ययांना पसंती देत आहेत.
बाणेर येथे प्रीमिअम प्रकल्पांचे बांधकाम सुरू असल्याने येथे ग्राहकांची मागणी वाढताना दिसत असल्याने येथील रिअल इस्टेटचे दर पुन्हा वाढले आहेत.
- वाकडमधील मालमत्तांचे दर प्रति चौरस फूट 7,500 रुपये आहेत, आघाडीच्या 10 ठिकाणांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक. त्यामध्ये तिमाही वाढ 1% झाली
- 83% ग्राहक बहुमजली इमारती शोधतात, तर उर्वरित ग्राहक व्हिला व स्वतंत्र घरे शोधतात
- बाणेरमध्ये लक्षणीय ग्राहकांनी 3 BHK चा शोध घेतला, आघाडीच्या 10 ठिकाणांमध्ये हे क्वचितच आढळले.
बांधकाम सुरू असणाऱ्या प्रीमिअम प्रकल्पांनी ग्राहकांच्या मागणीला चालना दिल्याने, गेल्या 3 तिमाहींमध्ये पिम्पळे सौदागर येथील रिअल इस्टेट दरामध्ये पुन्हा वाढ झाल्याचे मॅजिकब्रिक्सच्या आकडेवारातून स्पष्ट होते.
- परिसरामध्ये सरासरी दर प्रति चौरस फूट 7,110 रुपये, गेल्या एका वर्षामध्ये 1% वाढ
- मॅजिकब्रिक्सच्या आकडेवारीनुसार, केवळ 5% ग्राहक बांधकाम सुरू असणाऱ्या युनिटचा शोध घेतात, आघाडीच्या 10 परिसरांमध्ये हे सर्वात कमी. पिम्पळे सौदागर हा परिसर विकसित असल्याने, तेथील ग्राहकांचा कल तयार असलेली युनिट खरेदी करण्याकडे अधिक आहे.
- 80% ग्राहक अनफर्निश्ड मालमत्ता शोधत आहेत, परिसरात उपलब्ध असणाऱ्या स्वस्त पर्ययांना पसंती देत असल्याचे यातून सूचित होते
- 45% ग्राहक 2 BHK चा शोध घेतात, त्यास बहुतांश मागणी राहण्यासाठी किफायतशीर पर्यायाच्या शोधात असणाऱ्या आयटी प्रोफेशनलकडून आहे.
अहवालाविषयी बोलताना, मॅजिकब्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर पै म्हणाले: “विकसित, किफायतशीर, चांगल्या प्रकारे कनेक्टेड असणाऱ्या व राहण्यासाठी सज्ज असणाऱ्या अपार्टमेंटचा स्थिर पुरवठा असणाऱ्या ठिकाणांसाठी ग्राहकांची मागणी वाढत असल्याचेही निदर्शनात आले आहे. परवडणाऱ्या घरांसाठी सरकारचा सुरू असलेला प्रयत्न आणि करप्रणालीच्या माध्यमातून सवलती यामुळेही मागणी निर्माण होण्यासाठी मदत झाली आहे. राहण्यासाठी सज्ज असणाऱ्या अपार्टमेंटना घर ग्राहकांची पसंती कायम असून, आघाडीच्या दहापैकी आठ ठिकाणांच्या बाबतीत 75% हून अधिक ग्राहक राहण्यासाठी सज्ज असणाऱ्या अपार्टमेंट शोधतात. आघाडीच्या 10 ठिकाणांच्या यादीतील बहुतेकशा ठिकाणी उच्च दर असणारे प्रीमिअम प्रकल्प दाखल करण्यात आले असल्याने तेथील दरामध्ये वाढ झाल्याचे आढळले आहे.”
निवासी मालमत्तांसाठी ग्राहकांची मागणी वाढण्यासाठी ‘अफोर्डेबल हौसिंग’च्या व्याख्येमध्ये करण्यात आलेले बदल अतिशय महत्त्वाचे ठरले. यामुळे देशभर निवासी रिअल इस्टेटमधील ग्राहकांची रुची वाढली आहे आणि पारदर्शकपणे माहिती मिळणे पूर्वीपेक्षा अधिक शक्य झाले आहे.
पद्धत
हा अहवाल तयार करण्यासाठी, मॅजिकब्रिक्सने विविध ठिकाणांची मागणीला चालना देण्याची क्षमता तपासण्यासाठी भारतातील आघाडीच्या 100 शहरांतील ग्राहकांची पसंती जाणून घेतली. सध्याच्या सूक्ष्म आर्थिक स्थितीतील नवे हौसिंग व कन्झ्युमर ट्रेंड या विश्लेषणातून पुढे आले आहेत. त्यानुसार, कन्झ्युमर सर्चनुसार 2019 मधील तिसऱ्या तिमाहीतील भारतातील आघाडीची 10 ठिकाणे निवडण्यात आली.
मॅजिकब्रिक्सविषयी:
मॅजिकब्रिक्स ही भारतातील पहिल्या क्रमांकाची प्रॉपर्टी साइट आहे. साइटला दरमहा 20 दशलक्षहून अधिक व्हिजिट व 1.1 दशलक्षहून अधिक मालमत्तांची नोंदणी असणारे मॅजिकब्रिक्स हे प्रॉपर्टींचे ग्राहक व विक्रेते यांना अतिशय स्पष्ट, पारदर्शक पद्धतीने एकमेकाशी जोडले जाण्यासाठी सर्वात मोठे व्यासपीठ आहे. हे विचारात घेऊन, मॅजिकब्रिक्सने उत्पादनांची अनेक वैशिष्ट्ये, कण्टेण्ट व संशोधन सेवा यामध्ये नावीन्य आणले असून, त्यामुळे आम्हाला सर्वात मोठा ग्राहकवर्ग निर्माण करण्यासाठी मदत झाली आहे.